Lock Upp: कंगनाच्या अत्याचारी खेळात आता शेहनाज गिलची एंट्री, येणार नवा ट्विस्ट

Lock Upp: कंगनाच्या अत्याचारी खेळात आता शेहनाज गिलची एंट्री, येणार नवा ट्विस्ट

Lock Upp: कंगनाच्या अत्याचारी खेळात आता शेहनाज गिलची एंट्री, येणार नवा ट्विस्ट

कंगनाच्या अत्याचारी खेळाची म्हणजे ‘लॉकअप’शोची चांगलीच चर्चा आहे. आता या शोमध्ये ‘बिग बॉस सीझन १३’ची सदस्य शेहनाज गिलची एंट्री होणार आहे. माहितीनुसार, शहनाज गिल जेलमध्ये कैदीच्या रुपात नाही, तर जेलर म्हणून एंट्री करणार आहे.

‘बिग बॉस सीझन १३’चा विजेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर लोकांमध्ये शेहनाजला पाहण्याची खूप उत्सुकता होती. त्यानंतर शेहनाज ‘बिग बॉस सीझन १५’च्या फायनलमध्ये दिसली होती. टेलिचक्करच्या वृत्तानुसार, आता शेहनाज गिल एकता कपूरचा रिअॅलिटी शो लॉकअपमध्ये जेलर म्हणून एंट्री करणार आहे. कंगना रनौतच्या या शोबद्दल बोलायचे झाले तर हा जेल बंद कैद्यांमधील एक गेम शो आहे. या जेलमधून सर्व्हाइव करण्यासाठी खूप कठीण गेमचा सामना करावा लागतो.

दरम्यान शेहनाज गिलच्या पूर्वी लॉकअपच्या निर्मात्यांनी अभिनेता करण कुंद्राला जेलर म्हणून गेममध्ये पाठवले होते. तेव्हापासून शोची रेटिंग वाढली होती. आता शेहनाजच्या एंट्रीनंतर शोच्या रेटिंगमध्येही अधिक वाढ होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

‘लॉकअप’ शो सुरू होण्यापूर्वी शेहनाज गिल शोमध्ये कैदी म्हणून येणार असल्याची चर्चा होती. पण असे झाले नाही, शेहनाज शोमध्ये आली नाही. मात्र तरीही या शोची दर आठवड्याला चर्चा सुरू असते. आता येत्या काळात शेहनाजच्या एंट्रीनंतर शोमध्ये काय धुमाकूळ माजतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


हेही वाचा – Ranbir Alia Wedding: लायकी कळाली ना, KRKने आलियाच्या एक्स बॉयफ्रेंडची उडवली खिल्ली


First Published on: April 14, 2022 3:34 PM
Exit mobile version