शाहरुखने दिले या 5 अभिनेत्रींसोबत हिट चित्रपट

शाहरुखने दिले या 5 अभिनेत्रींसोबत हिट चित्रपट

बॉलिवूडचा बादशहा म्हणजेच अभिनेना शाहरुख खान याचा आज वाढदिवस आहे. शाहरुख खान आज त्याचा 57 वा वाढदिवस साजरा करत आहे. शाहरुखला त्याच्या चाहत्यांनी सुद्धा वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शाहरुखने त्याच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. शाहरुखने बॉलिवूड मधील अनेक बायिकांसोबत ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. किंग खानची या अभिनेत्रींसोबतची ऑन स्क्रिन जोडी प्रेक्षकांना पसंत पडली. जाणून घेऊन या शाहरुख खानच्या टॉप 5 अभिनेत्री आणि चित्रपट.

1) शाहरुख खान आणि काजोल

शाहरुख खान आणि काजोल या जोडीला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणावर पसंती दर्शवली. दिल वाले दुल्हनिया ले जायेंगे, कभी ख़ुशी कभी गम, कुछ कुछ होता है यासारखे अनेक चित्रपट या जोडीने बॉलिवूडला दिले. राहुल आणि अंजली यांची केमिस्ट्री प्रेक्षकांनी खूप आवडली. या चित्रपटांचे संवाद आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.

2) शाहरुख खान आणि जुही चावला

एस बॉस हा शाहरुख खान आणि जुही चावला यांचा चित्रपट हिट ठरला. या दोघांची ऑन स्क्रीन केमिस्ट्री सुद्धा प्रेक्षांना आवडली. खऱ्या आयुष्यात सुद्धा जुही चावला शाहरुखची खूप चांगली मैत्रीण आहे. एस बॉस सोबतच राजू बनेगा जेंटलमॅन या सारख्या चित्रपटांमध्ये जुहीने शाहरुख सोबत काम केले आहे. शाहरुखच्या रेड चिली या कंपनीमध्येही जुही चावला त्यःची पार्ट्नर आहे.

3) शाहरुख खान आणि राणी मुखर्जी

चलते चलते, कभी अलविदा ना केहेना या चित्रपटात शाहरुख खान राणी मुखर्जी सोबत दिसला होता. हे चित्रपट आणि यातील गाणी सुद्धा प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहेत.

4) शाहरुख खान आणि प्रीती झिंटा

कल हो ना हो, वीर – झारा या चित्रपटांमध्ये शाहरुख खान अभिनेत्री प्रीती झिंटा हिच्यासोबत दिसला होता. या चित्रपटाला सुद्धा प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला.

5) शाहरुख खान आणि दीपिका पदुकोन

चेन्नई एक्सप्रेस, ओम शांती ओम या चित्रपटांमध्ये शाहरुख दीपिका सोबत बसला होता. हे दोन्ही चित्रपट सुपर हिट ठरले. त्याच सोबत या दोन्ही चित्रपटांमधील गाणीसुद्धा खूप जास्त हिट झाली.


हे ही वाचा – किंग खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांची मन्नतबाहेर गर्दी; व्हिडीओ व्हायरल

First Published on: November 2, 2022 1:37 PM
Exit mobile version