Shahrukh Khan ने बदलली ‘Mannat’ बंगल्याची नेम प्लेट, सोशल मीडियावर चर्चांना उधाण

Shahrukh Khan ने बदलली ‘Mannat’ बंगल्याची नेम प्लेट, सोशल मीडियावर चर्चांना उधाण

Shahrukh Khan ने बदलली 'Mannat' बंगल्याची नेम प्लेट, सोशल मीडियावर चर्चांना उधाण

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान गेल्या अनेक दिवसांपासून कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत आहे.
शाहरुख शनिवारी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. नुकतीच अभिनेत्याने त्याच्या मन्नत या बंगल्याची नेम प्लेट बदलली आहे. यानंतर शाहरूख खानच्या बंगल्याच्या नव्या नेम प्लेटचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामुळे ‘मन्नत’ सोशल मीडियावर ट्रेंड करू लागला आहे. पण शाहरुखच्या मन्नत बंगल्याची नेम प्लेट चेंज करण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी तीन वेळा शाहरूखने नेम प्लेट चेंज केली होती, आणि आता ही चौथी वेळ आहे. शाहरूखच्या चाहत्यांसाठी हा मन्नत नेम प्लेट बदल खूप भावनिक आहे. काही चाहत्याचे मत आहे की, मन्नतची जुनी नेम प्लेटच नेहमी आयकॉनिक राहील, तर काहींना नवीन नेम प्लेट स्टायलिश आणि खूप खास वाटतेय.

नेम प्लेटचा फोटो शेअर करून चाहते आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका चाहत्याने मन्नतच्या नावाच्या प्लेटचे चार वेगवेगळे फोटो शेअर केले आणि लिहिले, ‘#Development of Mannat नेम प्लेट’. आणखी एका चाहत्याने नवीन नेम प्लेटचा फोटो शेअर केला आणि लिहिले, ‘मन्नतची नवीन नेम प्लेट. मन्नत हे स्टारडम, प्रेम, भावना, आवड, मेहनत आणि समर्पण यांचे प्रतीक आहे.

त्याचवेळी एका चाहत्याने लिहिले, ‘देवाचा स्वर्ग. शाहरुख खान असेल तर नेम प्लेटही ट्रेंड करू लागते. शाहरुखचा मन्नत हा बंगला मुंबईतील वांद्रे येथे समुद्राच्या बाजूला आहे. त्याची किंमत सुमारे 200 कोटी आहे.

अलीकडेच शाहरुखने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून दिग्दर्शक राजकुमार हिरानीसोबत त्याच्या डंकी चित्रपटाची घोषणा केली. हा चित्रपट 22 डिसेंबर 2023 रोजी रिलीज होणार आहे. मात्र, त्यांनी या चित्रपटाबाबत अधिक माहिती दिली नाही. डंकीच्या आधी शाहरुख अॅक्शन थ्रिलर ‘पठाण’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्याही भूमिका आहेत. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.


थप्पड प्रकरणामुळे विल स्मिथच्या आयुष्यात नवं वादळ! जेडा विल स्मिथला देणार घटस्फोट

First Published on: April 24, 2022 3:45 PM
Exit mobile version