घरमनोरंजनथप्पड प्रकरणामुळे विल स्मिथच्या आयुष्यात नवं वादळ! जेडा विल स्मिथला देणार घटस्फोट

थप्पड प्रकरणामुळे विल स्मिथच्या आयुष्यात नवं वादळ! जेडा विल स्मिथला देणार घटस्फोट

Subscribe

94 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात प्रसिद्ध अमेरिकन अभिनेता विल स्मिथला कॉमेडियन सूत्रसंचालक ख्रिस रॉकच्या कानाखाली मारणे चांगलेच भारी पडले आहे. ख्रिसने विलची पत्नी जेडा स्थिमची तिच्या आजारपणावरून खिल्ली उडवली होती. यावेळी राग अनावर झाल्याने स्मिथने ऑस्करच्या स्टेजवर जाऊन त्याच्या कानाखाली मारली, हे प्रकरण जगभरात चांगले गाजले. मात्र या प्रकरणामुळे आता विल स्मिथ्या वैयक्तिक आयुष्यात नवं वादळ निर्माण झालं आहे. विल आणि जेडा यांच्या वैवाहिक आयुष्यात आधीचं अनेक कलह होत्या मात्र या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील घटनेनंतर हा कलह वाढला आहे. त्यामुळे हे दोघं जण लवकरचं घटस्फोट घेण्याची शक्यता वर्तवली जातेय.

ऑस्करमधील घटनेनंतर विल स्मिथ आणि जेडा यांच्यातील दुरावा वाढत असून संवाद कमी झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या वैवाहिक आयुष्यात अडचणी होत्या मात्र या अडचणी अधिक वाढल्या आहेत. यामुळे हॉलिवूड इंडस्ट्रीत या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगत आहे. जर असे झाले तर हा घटस्फोट हॉलिवूडमधील सर्वात महागडा घटस्फोट ठरू शकतो. कारण विलच्या संपत्तीमधील अर्धी संपत्ती जेडाला मिळेल. विल स्मिथ याची एकूण संपत्ती 350 मिलियन डॉलर म्हणजे दोन हजार कोटी रुपये इतकी आहे. हा ब्रेट पिट आणि एंजेलिना जॉली यांच्या घटस्फोटापेक्षाही विल आणि जेडाचा घटस्फोट महागडा ठरू शकतो.

- Advertisement -

ऑस्करच्या थप्पड प्रकरणनंतर विल स्मिथवर अकॅडमीने दहा वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. विल आणि जेडाने 1997 मध्ये लग्न केले. या लग्नानंतर दोघांना तीन मुलं आहेत.


sidharth malhotra आणि kiara advani चं ब्रेकअप! दोघांच्या इन्स्टा पोस्टची चाहत्यांमध्ये चर्चा


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -