शक्तिमान फेम मुकेश खन्नाने मुलींबाबत केलं वादग्रस्त वक्तव्य; सोशल मीडियावर नेटकरी भडकले

शक्तिमान फेम मुकेश खन्नाने मुलींबाबत केलं वादग्रस्त वक्तव्य; सोशल मीडियावर नेटकरी भडकले

पूर्वी हिंदी टेलिव्हिजनवर शक्तिमान ही लोकप्रिय भूमिका साकारणारा ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना नुकत्याच त्यांच्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे अनेकजण त्यांना ट्रोल करू लागले आहेत. मुकेश खन्ना भीष्म इंटरनॅशनल नावाचा एक यूट्यूब चॅनल चालवतात. या आठवड्यामध्ये त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला होता. तो सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.

मुकेश खन्ना यांनी त्या व्हिडीओमध्ये म्हटलंय की, “जर एखादी मुलगी एखाद्या मुलाला स्वतःहून शरीरसंबंधांसाठी विचारत असेल तर ती मुलगी असभ्य आहे. ती मुलगी, मुलगी नसून एक धंदा करणारी आहे. कारण अशाप्रकारच्या निर्लज बाता सभ्य समाजातील मुलगी कधीच करू शकत नाही.” मुकेश खन्ना यांच्या या व्हिडीओवर सोशल मीडियावरील अनेकजण ट्रोल करू लागले आहेत. अनेकांनी त्या व्हिडीओखाली अनेक कमेंट्स देखील केल्या आहेत.

तर तिसऱ्या एकाने लिहिलंय की, “स्त्री शक्तिचा तरी मान ठेवा, तर आणखी एकाने लिहिलंय की, शक्तिमान म्हातारपणात काहीही बोलतोय, बहुतेक तो आता सनकीमान झालाय.”


हेही वाचा :सुप्रसिद्ध कॉमेडीयन राजू श्रीवास्तव यांना हृदय विकाराचा झटका; दिल्ली हॉस्पिटलमध्ये भर्ती

First Published on: August 10, 2022 4:57 PM
Exit mobile version