ब्रेथलेसनंतर आता शंकर महादेवन यांचे ‘नॉनस्टॉप इंडिया’

ब्रेथलेसनंतर आता शंकर महादेवन यांचे ‘नॉनस्टॉप इंडिया’

शंकर महादेवन, गायक

‘कोई जो मिला तो मुझे……’ शंकर महादेवन यांचे ब्रेथलेस हे गां अनेकांना आवडत असेल. आता पटकन तुम्हाला हे गाण ऐकण्याचा मोह झाला असेल तर थांबा कारण आता शंकर महादेवन यांनी ब्रेथलेस ‘नॉनस्टॉप इंडिया’ हे गाणं स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांच्या फेसबुक पेजवरुन शेअर केले आहे. भारताची युवा पिढी आणि विकसित देशाकडे होणारी भारताची वाटचाल या गाण्यातून दाखवण्यात आली असून या गाण्यातील पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॅग करण्यात आले आहे.

बघा व्हिडिओ

भारत हा विकसनशील देश आहे. हे आपण पुस्तकात अनेकदा वाचले असेल. पण आता हे चित्र बदलत आहे. देशाची विकसित देशाकडे वाटचाल होत आहे. आता हा नवा व्हिडिओ देशातील अनेक नवे उपक्रम दाखवत आहे. ‘युवा’ या गाण्यातील केंद्र बिंदू असून शंकर महादेवन यांच्या ब्रेथलेस गाण्याच्या थीमवर हे गाणं असल्यामुळे लगेचच त्या गाण्याची देखील आठवण येते.

ब्रेथलेस गाण्याची झाली आठवण

१९९८ साली शंकर महादेवन यांचे ब्रेथलेस हे गाणं आलं होतं. हिंदीत असा प्रयत्न पहिल्यांदाच करण्यात आला होता. एका श्वासात तब्बल २.३८ मिनिट हे गाणं शंकर महादेवन यांनी गायले होते. आजही हे गाणे अनेकांच्या आवडीच्या गाण्यांच्या लिस्टमध्ये आहे.

(सौजन्य-युट्यूब)

First Published on: August 15, 2018 5:32 PM
Exit mobile version