दिल्लीत ‘फौजी कॉलिंग’ चित्रपट टॅक्स फ्री

दिल्लीत ‘फौजी कॉलिंग’ चित्रपट टॅक्स फ्री

दिल्लीत 'फौजी कॉलिंग' चित्रपट टॅक्स फ्री

‘फौजी कॉलिंग’ हा चित्रपट लवकर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदर चित्रपटासाठी गोड बातमी आहे. आणि ही बातमी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे. हा चित्रपट दिल्लीमध्ये टॅक्स फ्री करण्यात आला आहे. ‘फौजी कॉलिंग’ हा चित्रपट सैनिकाच्या जीवनावर आधारित आहे. जेव्हा सैनिक लढण्यासाठी युद्ध पातळीवर जातात तेव्हा त्याच्या कुटूंबियांच्या नक्की काय भावना असतात. हे दाखवण्याचा प्रयत्न ‘फौजी कॉलिंग’ या चित्रपटात केला आहे. बॉलिवूड अभिनेता शरमन जोशीचा ‘फौजी कॉलिंग’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

‘फौजी कॉलिंग’ या चित्रपटातील सर्व मेंबरने आणि कलाकारांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे आभार मानले आहेत.’फौजी कॉलिंग’ या सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन आर्यन सक्सेनाने केले आहे. तर या सिनेमाची निर्मिती नायदा शेख, ओवेज शेख, विक्रम कुमार, अनिल जैन आणि विजीता वर्मा यांच्याद्वारे करण्यात आली आहे. हा चित्रपट १२ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे पोस्टर आणि ट्रेलर प्रदर्शित झाले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना ट्रेलर पाहून अभिनेता शरमन जोशीची भूमिका खूप आवडली आहे.


हेही वाचा – बाळासाहेबांच्या खोलीत ठरलेली गोष्ट बाहेर तुम्ही नाकारता, हेच तुम्ही हिंदुत्व ? – उद्धव ठाकरे

 

First Published on: March 3, 2021 8:31 PM
Exit mobile version