मी पूर्ण कपड्यांत…; उर्फी जावेद प्रकरणावर शर्मिला ठाकरेंची प्रतिक्रिया

मी पूर्ण कपड्यांत…; उर्फी जावेद प्रकरणावर शर्मिला ठाकरेंची प्रतिक्रिया

सोशल मीडिया स्टार उर्फी जावेद सध्या तिच्या कपड्यांमुळे वादात सापडली आहे. तिच्या कपड्यांवरून अनेकांनी तिला टार्गेट केले. सोशल मीडियावरचं नाही तर राज्याच्या राजकारणात आता उर्फी जावेदच्या तोकड्या कपड्यांचा मुद्दा गाजतोय. यावरूनच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदला टार्गेट केले आहे. मागील अनेक दिवसांपासून दोघींमध्ये सध्या सोशल मीडियावरून शाब्दिक वाद सुरु आहे. अशातच शुक्रवारी उर्फीने महिला आयोगाकडे धाव घेतली असून चित्रा वाघ यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. तसेच शनिवारी मुंबई पोलिसांनी उर्फी जावेदला समन्स बजावलं होतं.

या सर्व घडामोडींदरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी उर्फीच्या कपड्यांसंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. त्या नवी मुंबईमध्ये क्रिकेट सामना पाहण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना त्यांना उर्फी आणि चित्रा वाघ यांच्या वादाबाबत त्यांचे मत विचारण्यात आले. त्यावेळी त्या म्हणाल्या की, “मी पूर्ण कपड्यांत फिरते. बाकीच्यांचे मला माहीत नाही,” असं स्पष्ट उत्तर शर्मिला ठाकरेंनी दिलं.

उर्फीचा जबाब


हेही वाचा :

चित्रा वाघ यांच्यामुळे माझ्यावर हल्ला होऊ शकतो; उर्फी जावेदची महिला आयोगाकडे तक्रार

First Published on: January 16, 2023 9:46 AM
Exit mobile version