शिबानीने बॉयफ्रेंड फरहान अख्तरसाठी मानेवर काढलं स्पेशल टॅटू

शिबानीने बॉयफ्रेंड फरहान अख्तरसाठी मानेवर काढलं स्पेशल टॅटू

शिबानीने बॉयफ्रेंड फरहान अख्तरसाठी मानेवर काढलं स्पेशल टॅटू

बॉलिवूड विश्वातील सर्वांत लोकप्रिय असणाऱ्या जोड्यांपैकी फरहान अख्तर(farhan akhtar) आणि शिबानी दांडेकर (shibani dandekar)ही जोडी अनेकांची लाडकी जोडी ठरत आहे. (shibani dandekar tattoed)ही जोडी नेहमी एकत्र धम्माल करताना दिसतात. यामुळेच अभिनेता फरहानची गर्लफ्रेंड शिबानी नेहमीच चर्चेत असतात. गेली अनेक वर्षापासून दोघेही एकमेकांना डेट करत आहेत. दोघेही आपलं प्रेम जाहीर करण्याची एकही संधी सोडत नाही. आज शिबानीसाठी खास दिवस आहे. शिबानी दांडेकर तिचा 41वा वाढदिवस साजरा करत आहे. या स्पेशल दिवशी शिबानीने फरहानची आठवण कायम राहील अशा प्रकारे एक टॅटू काढला आहे.(shibani dandekar tattoed farhan akhtar name on neck)

शिबानीने तिच्या सोशल मीडिया अकांऊट इस्टाग्रावर स्टोरी शेअर करत तिचे फरहानवर किती प्रेम आहे हे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. या खास दिवशी तिने चक्क आपल्या मानेवर फरहान अखत्तरच्या नावाचं टॅटू काढला आहे. सध्या शिबानीचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांना तर तिने काढलेला हा टॅटू फारच पसंत पडला आहे.

सोशल मीडियावर फरहान आणि शिबानीच्या या टॅटूची चर्चा होत आहे. गेले अनेक वर्षापासून एकमेकांना डेट करणारे लव बर्ड कधी लग्नबंधनात अडकतील याची वाट चाहते आतुरतेने पाहत आहेत. दोघेही अनेक सार्वजनिक समारंभात तसंच पार्ट्यांमध्ये एकत्र हजेरी लावतात. मध्यंतरी या दोघांनी एकमेकांची आपापल्या कुटुंबिंयासोबत भेट घडवून आणली होती. फरहानने २०१७ साली त्याची पहिली पत्नी अधुनाशी घटस्फोट घेतला होता. त्यानंतर त्याने आणि शिबानीने एकमेकांना डेट करायला सुरुवात केली.


हे हि वाचा – बिग बींच्या सुरक्षेतील हेड कॉन्स्टेबल जितेंद्र शिंदेची बदली, वर्षाला मिळत होता 1.5 कोटी पगार !

First Published on: August 27, 2021 12:31 PM
Exit mobile version