घरमनोरंजनबिग बींच्या सुरक्षेतील हेड कॉन्स्टेबल जितेंद्र शिंदेची बदली, वर्षाला मिळत होता 1.5...

बिग बींच्या सुरक्षेतील हेड कॉन्स्टेबल जितेंद्र शिंदेची बदली, वर्षाला मिळत होता 1.5 कोटी पगार !

Subscribe

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (amitabh bachchan) यांनी आपल्या अभिनय कौशल्येच्या जोरावर गेली अनेक दशके सिनेसृष्टीत अधिराज्य गाजवत आहेत. अमिताभ यांना अनेक कलाकार त्यांचे प्रेरणास्थान मानतात. अमिताभ यांची फॅन फोलोईंग भली मोठी असून फक्त भरतातच नाही तर परदेशातही त्यांचे अगणित चाहते आहेत. अमिताभ यांची फक्त एक झलक पाहण्यासाठी अनेक चाहते मुंबईत(mumbai) त्यांच्या घराबाहेर वाट पाहत उभे राहतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी बॉडीगार्ड जितेंद्र शिंदे (bodygurad jitendra shinde) नेहमीच त्यांच्या सोबत दिसून येतात. महानायक बिग बींच्या सुरक्षीततेसाठी तैनात असणारा हा बॉडीगार्ड यासाठी तगडी रक्कम देखील आकारत असल्याचे कळतेय. जितेंद्र शिंदे यांचा वार्षिक पगार ऐकून सर्व जण थक्क झाले आहेत.(amitabh bachchans police bodyguard transfered)

टाईम्स नाऊच्या रिपोर्टनुसार जितेंद्र शिंदे यांचा वार्शिक पगार तब्बल 1.5 कोटी रुपये इतका आहे. म्हणजेच दरमाहा जितेंद्र यांना 12,50,000 पगार मिळतो. एखादा सर्वजनिक कार्यक्रम असो किंवा इंटरनॅशल ट्रीप जितेंद्र शिंदे अमिताभ बच्चन यांच्या सोबत सावलीप्रमाणे असायचे.(bodygurd jitendr shine salary)

- Advertisement -

जितेंद्र शिंदे यांचा स्वत:ची सेक्यूरिटी एजन्सी असून त्या सेलिब्रिटींना त्यांच्या सुरक्षेसाठी बॉडीगार्ड आणि सुरक्षा पुरवतात. तसेच त्यांची पत्नी देखील मोठा व्यवसाय करत असल्याची माहिती समोर येत आहे. यांनतर जितेंद्र यांना मिळणाऱ्या मिळकतीचा पोलिस तपास करत असून एका सरकारी कर्मचाऱ्याला सरकारकडून पगार मिळत असूनही तो इतर पद्धतीने पैसे घेण्याची परवानगी नाही. असे अधीकाऱ्यांनी सांगितले आहे.

 

- Advertisement -

जितेंद्र शिंदे यांची बदली-

आजतागयत जितेंद्र शिंदे महानायक यांची सुरक्षा करत होते. मात्र जितेंद्र यांना मुंबई पोलिस डिपार्टमेंटमध्ये भरती करण्यात आलं आहे.एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला नुकतीच मुलाखत दिली आणि जितेंद्र यांची बदली झाल्याचे सांगितले.  जितेंद्र शिंदे हे बॉलिवूडमधील महागड्या बॉडीगार्डपैकी एक आहे.

अत्तापर्यंत आपण सलमान खानच्या बॉडीगार्ड बद्दल ऐकले असेल मात्र जितेंद्र शिंदे यांनी देखील अनेक इंटरनॅशल सेलिब्रिटींना सुरक्षा पुरवली आहे. लोकप्रिय हॉलिवूड अभिनेता एलिजा वुडच्या भारत दौऱ्यादरम्यान अमिताभ बच्चन यांच्या सांगण्यावरुन जितेंद्र शिंदे यांनी सुरक्षा दिल्याची माहिती समोर येत आहे. सध्या सोशल मीडियावर महानायक अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा त्यांच्या बॉडीगार्डची चर्चाच अधीक होत आहे.(amitabh bachchan bodygurad jitendra shinde)

 


हे हि वाचा – विजय सेतुपति-तापसी पन्नूने शेअर केला ‘ऐनाबेले सेतुपति’चा फर्स्ट लूक

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -