India’s Got Talent मध्ये शिल्पा शेट्टी होणार परीक्षकाच्या खुर्चीत विराजमान

India’s Got Talent मध्ये शिल्पा शेट्टी होणार परीक्षकाच्या खुर्चीत विराजमान

India's Got Talent मध्ये शिल्पा शेट्टी होणार परीक्षकाच्या खुर्चीत विराजमान

टेलीव्हीजनवर इंडियाज गॉट टॅलेंट(India’s Got Talent) या रियालिटी शोमध्ये लोकांना आपले कौशल्य, प्रतिभा देशभरात दाखवण्याची संधी प्राप्त होते. यंदा या लोकप्रिय शो पहिल्यांदा सोनी टिव्हीवर प्रसारीत होणार आहे. सोनी टिव्हिने अधीकृतरीत्या याची घोषणा केली असून लोकप्रिय सुपस्टारचा प्रोमे जारी केला आहे. आणि ऑडिशनला सुरुवात झाली असल्याची माहिती दिली आहे. तसेच या प्रोमोमध्ये बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी झळकत आहे. यंदाचा सिझन शिल्पा जज करणार असल्याची महत्वपूर्ण माहिती सोशल मीडियावर देण्यात आली आहे.( Shilpa Shetty will judge India’s Got Talent )

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानूसार इंडियाज गॉट टॅलेंटचा आगामी सिझनमध्ये शिल्पा परीक्षकाच्या भूमिकते दिसणार आहे, तसेच येत्या काही दिवसातच आणखी कोण परीक्षकाच्या खुर्चीत विराजमान होणार आहे याची देखी माहिती देण्यात येईल. सध्या सोशल मीडियावर हा प्रोमो व्हायरल होत असून शिल्पाला पुन्हा एकदा नव्या शोमध्ये पाहून नेटकऱ्यांचा समिश्र प्रतिसाद मिळत आहे.

प्रोमो पाहा- 

2009 साली इंडियाज गॉट टॅलेंटचा पहिला एपिसोड टेलिकास्ट झाला होता. आत्तापर्यंत 100 एपिसोड टेलिकास्ट झाले आहेत. शोमध्ये अनेक प्रतिभावान स्पर्धक भाग घेऊन लोकांचे मनोरंजन करतात. किरण खेर, सोनाली ब्रेंद्रे,शेखर कपूर, करण जोहर, मलायका अरोरा सारख्या कलाकारांनी हा शो जज केला आहे.


हे हि वाचा – Bigg Boss OTT: दिव्यामुळे नेहा भसीनला येत आहे आत्महत्येचा विचार?,मुलाखती दरम्यान केला खुलासा

First Published on: September 21, 2021 4:55 PM
Exit mobile version