घरमनोरंजनBigg Boss OTT: दिव्यामुळे नेहा भसीनला येत आहे आत्महत्येचा विचार?,मुलाखती दरम्यान केला...

Bigg Boss OTT: दिव्यामुळे नेहा भसीनला येत आहे आत्महत्येचा विचार?,मुलाखती दरम्यान केला खुलासा

Subscribe

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त रियालीटी शो बिग बॉसचा(bigg boss ott) तेरावा सिझन यंदा ओटीटीवर खूप गाजला. काही दिवसांपूर्वी दिव्या अग्रवाल (divya agrwal)हिने बिग बॉस ओटीटीचा पुरस्कार पटकावला. बिग बॉस ओटीटीची सांगता झाली असली तरी याचा दरारा आजूनही सगळीकडे दिसत आहे. शोमधील स्पर्धकांची चर्चा सोशल मीडियावर(social media) तुफान रंगत आहे. दरम्यान विजेती दिव्या अग्रवाल आणि स्पर्धक नेहा भसीनचे घरामध्ये फारसे काही पटले नाही. संपूर्ण सिझन दोघांमध्ये अनेक वाद उफाळून आले, यानंतर शो मधून बाहेर आल्यावर नेहाने दिव्यावर गंभीर आरोप केला आहे. दिव्यामुळे माझ्या मानसिक स्थितीवर परिणाम झाल्याचे नेहाने सांगितले आहे.(neha bhasin accuses bigg boss winner divya agrwal)

एका मुलाखती दरम्यान नेहाने याबाबत खुलासा केला आहे. नेहा म्हणाली , करीयरच्या सुरूवातीला मला दिव्या सारखे अनेक लोकं भेटली जी व्यक्तीच्या भावनांशी खेळतात. ज्यामुळे मी डीप्रेशनमध्ये गेली होती आणि मला आत्महत्या करण्याचे विचार येत होते. बिग बॉसच्या घरात दिव्या सुद्धा असेच काही माझ्यासोबत करत होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Neha Bhasin (NB) (@nehabhasin4u)

- Advertisement -

नेहाच्या या आरोपावर दिव्याने स्पष्टीकरण दिले आहे. स्पॉटबॉय सोबत बोलताना दिव्या म्हणाली हे खूप हास्यास्पद आहे तुम्ही कशा प्रकारे कोणाला प्रभावित करु शकतात. नेहा नेहमीच बोलत असते की मी एक सक्षम महिला आहे. मात्र सक्षम आपल्या भीतीवर मात करत पुढे येण्याचा प्रयत्न करतात. दिव्याने आपले मत मांडत नेहाने केलेल्या आरोपाचे खंडण केले आहे.

- Advertisement -

हे हि वाचा – टोस्टवर थुंकणाऱ्या बेकरी कामगाराचा व्हिडिओ पाहून रवीनाचा संताप, म्हणाली यांना तुरुंगात डांबा

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -