आयुष्यमानच्या ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ या चित्रपटाच्या कमाईत घट

आयुष्यमानच्या ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ या चित्रपटाच्या कमाईत घट

आयुष्यमानच्या 'शुभ मंगल ज्यादा सावधान' या चित्रपटाच्या कमाईत घट

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना याचा ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ हा चित्रपट २१ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला. आयुष्मानच्या या चित्रपटाने पहिल्या दिवसांपासूनच बॉक्स ऑफीवर धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. मात्र आता या चित्रपटाच्या कमाईत घट होताना दिसत आहे. बॉक्स ऑफिस इंडिया डॉट कॉमच्या वेबसाइटनुसार चौथ्या दिवशी ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ या चित्रपटाने फक्त ३.५० कोटींची कमाई केली आहे. यानुसार चार दिवसात या चित्रपटाने ३४ कोटींची कमाई केली आहे.

‘गे’ प्रेमकथेवर आधारित असलेला या चित्रपटाची कहाणी प्रेक्षकांची मन जिंकत आहे. तसंच आयुष्मान खुराना देखील चाहत्यांची मनं जिंकण्यासाठी प्रयत्न करीत आहे. असं असलं तरी प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद बॉक्स ऑफिवर मिळत आहे. या चित्रपटाची कहाणी समलैंगिक जोडप्या विषयी आहे. आयुष्मान खुराना आणि अमन त्रिपाठी हे दोघं चित्रपटात प्रेमी युगुल दाखवलं आहे.

या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. आयुष्मान खुराने बॉलिवूड चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर त्यांने सुरुवातीपासूनच चौकटीबाहेरील विषयांची निवड केली आहे. आयुष्मानचा ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ हा चित्रपट अनेक कारणांसाठी वेगळा आहे. या चित्रपटात आयुष्मान खुरानासोबत जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, गजराव राज आणि पंखुरी अवस्थी देखील आहे.


हेही वाचा – अभिनेत्री मेघा घाडगेच्या फेसबुक पोस्टवर अश्लील कमेंट, पोलिसांत तक्रार दाखल


 

First Published on: February 25, 2020 4:22 PM
Exit mobile version