Shershah Teaser: सिद्धार्थ-कियाराचा चित्रपट ‘शेरशाह’चा टिझर प्रदर्शित; OTTवर पाहता येणार

Shershah Teaser: सिद्धार्थ-कियाराचा चित्रपट ‘शेरशाह’चा टिझर प्रदर्शित; OTTवर पाहता येणार

कारगिल हीरो विक्रम बत्रावर आधारित 'शेरशाह' चा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

कारगिल युद्धात शहीद झालेले परमवीर चक्र विजेते कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित ‘शेरशाह’ चित्रपटागृहांऐवजी ओटीटी प्लेटफॉर्म अॅमेझोन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. बऱ्याच दिवसांपासून ‘शेरशाह’ ओटीटीवर प्रदर्शित होणार अशी चर्चा सुरू होती. परंतु गुरुवारी प्राईमने याबाबत अधिकृत घोषणा करून चित्रपटाचा टिझर प्रदर्शित केला आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन विष्णुवर्ध्दनने केले असून निर्मिती करण जोहरची कंपनी धर्मा प्रोडक्शन करत आहे. करण जोहरचा हा अॅमेझोन प्राइमसोबतचा पहिलाच प्रोजेक्ट आहे. या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी प्रमुख भूमिकेत असणार आहेत. स्वतंत्र दिनाच्या पूर्वेसंध्येला १२ ऑगस्टला ‘शेरशाह’ प्रदर्शित होणार आहे. याबाबतची घोषणा अॅमेझोन प्राइमने सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे.

प्राइमने चित्रपटाचा टिझर शेअर केला आहे, ज्यामध्ये कारगिल युद्ध आणि कॅप्टन विक्रम बत्रा यांचे काही क्लिप्स दाखवले आहेत. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी व्यतिरिक्त शिव पंडित, राज अर्जुन, प्रणय पचौरी, हिमांशु अशोक मल्होत्रा, निकितिन धीर, अंकिता गोराया, अनिल चरणजीत, साहिल वैद्य, शाताफ फिगर आणि पवन चोप्रा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

यापूर्वी ‘शेरशाह’ २ जुलैला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता. परंतु कोरोना व्हायरसमुळे चित्रपटगृह बंद झाले आणि चित्रपटाचे प्रदर्शन स्थगित करण्यात आले. महाराष्ट्रात चित्रपटगृह बंद झाल्याचा परिणाम जास्त पडला आहे. हिंदी चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचा सर्वात मोठा भाग मुंबई आहे. पण मुंबईत देखील चित्रपटगृह बंद आहे. त्यामुळे आता अनेक चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित केले जात आहेत.

First Published on: July 15, 2021 4:29 PM
Exit mobile version