Sitaradevi Birth anniversary: रेखा,मधुबाला आणि काजोलला डान्स शिकवणाऱ्या सितारा देवींच्या जीवनावर आधारित सिनेमाची घोषणा

Sitaradevi Birth anniversary:  रेखा,मधुबाला आणि काजोलला डान्स शिकवणाऱ्या सितारा देवींच्या जीवनावर आधारित सिनेमाची घोषणा

Sitaradevi Birth anniversary: रेखा,मधुबाला आणि काजोलला डान्स शिकवणाऱ्या सितारा देवींच्या जीवनावर आधारित सिनेमाची घोषणा

भारतीय शास्रीय नृत्यातील कथ्थक क्विन सितारा देवी यांची आज १०१वी जयंती. भारतातील प्रतिष्ठीत कलाकारांमध्ये सितारा देवी यांचे नाव आवर्जुन घेतले जाते. संगीत नाटक अकादमी पुरस्कार,पद्मश्री आणि कालिदास पुरस्काराने सन्मानित सितारादेवींचे कथ्थक नृत्यात महत्त्वाचे योगदान आहे. सितारा देवींच्या आज १०१व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिने निर्माते राज आनंद मूव्हीजचे राज सी आनंद यांनी सिनेमाचा घोषणा केली आहे. सितारा देवींच्या आयुष्याचा प्रवास मोठ्या पडद्यावर आणून तो प्रवास पुन्हा एकदा जीवंत करण्यासाठी मी फार उत्साही आणि आनंदी आहे. प्रेक्षकांनाही सितारा देवींच्या आयुष्याचा प्रवास पाहण्यास आवडेल अशी आशा आहे. सितारा देवींवर आधारित सिनेमा हा वास्तविक जीवनातही सर्वांच्या आकर्षिक करेल असे आश्वासन देतो, असे त्यांनी म्हटले आहे.  सितारादेवींच्या जिवानावर आधारित सिनेमा मोठ्या पडद्यावर पहायला मिळणे म्हणजे सर्व शास्त्रीय कलाकारांसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे.

सितारादेवींचा जन्म ८ नोव्हेंबर १९२० रोजी झाला. त्यांना त्यांच्या वडिलांकडून कविता आणि नृत्यकलेची प्रेरणा मिळाली. प्रसिद्ध संगितकार आणि ड्रमर रंजीत बरोट हे सितारादेवींचे पुत्र आहेत. त्यांनी आपल्या आईच्या आयुष्यावर आधारित सिनेमासाठी संपूर्ण टीमला योग्य मार्गदर्शन करण्याची जबाबदारी घेतली आहे. ‘आईच्या आयुष्यावर आधारित सिनेमा तयार होणार हे कळल्यावर मी फारच उत्साही झालो आहे. निर्माते राज आनंद जेव्हा सिनेमाचा प्रस्ताव घेऊन आले तेव्हा हा विचार मला खरंच आवडला. आई खरंच एक प्रतिष्ठीत कलाकरा होती. या माध्यमातून तिची जीवन कहाणी मोठ्या पडद्यावर दिसणे महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.

प्री प्रोडक्शनने सितारा देवींच्या जीवनावर संपूर्ण रिचर्स केला असून निर्माते लवकरच सिनेमातील कलाकारांच्या नावांची घोषणा करणार आहेत. सितारादेवी केवळ उत्तम नृत्यांगनाच नाही तर एक उत्तम सशक्त महिला होत्या. स्वत: च्या अटींवर जगून त्यांनी स्त्रीवाद आणि स्त्रीत्वाची विचारधारा मजबूत केली.

सितारा देवींनी बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री रेखा, मधुबाला, काजोलला देखील डान्स शिकवला होता. सहा दशकांहून अधिक काळ सितारादेवींनी शास्त्रीय नृत्यात आपले मोलाचे योगदान दिले. त्यात त्यांनी बॉलिवूडमध्ये केलेले नृत्य दिग्दर्शन सर्वांच्या लक्षात राहिले. त्यांच्या या योगदानासाठी त्यांना लेजेंड ऑफ इंडिया लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड २०११ने सन्मानित करण्यात आले. सितारा देवी यांचे दिर्घ आजाराने २५ नोव्हेंबर २०१४ साली मुंबईतील एका रुग्णालयात निधन झाले.


हेही वाचा – ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ संताजी धनाजी यांना हाताशी घेऊन स्वराज्य राखणाऱ्या मराठ्यांच्या सर्वश्रेष्ठ साम्राज्ञी

First Published on: November 8, 2021 9:39 PM
Exit mobile version