राहूल गांधींना हरविल्यानंतर स्मृती इराणींनी फेडला सिद्धिविनायकाचा नवस ?

राहूल गांधींना हरविल्यानंतर स्मृती इराणींनी फेडला सिद्धिविनायकाचा नवस ?

आज मंगळवारचा मुहूर्त साधून अमेठीच्या खासदार स्मृती इराणी यांनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. या दर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे स्मृती इराणी यांनी १४ किलोमीटर पायी जाऊन हे दर्शन घेतले. त्यांची जवळीची मैत्रीण आणि निर्माती एकता कपूरने ही माहिती इन्टाग्रामवर दिली आहे. यानंतर एकता कपूर यांनी त्यांचा एकत्र फोटोही इन्टावर शेअर केला आहे. त्यात लिहिलेय ‘१४ किलोमीटर चालत जाऊन सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यावर उजळलेला चेहरा’.

स्मृती इराणी यांनी अमेठी लोकसभा मतदारसंघातून यंदा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना पराभूत करून एक इतिहास घडविला. दरम्यान एकता कपूरने स्मृती इराणी यांच्यासोबतचे व्हिडिओ इन्टाग्रामवर शेअर केले आहेतत्या म्हणाल्या की ईश्वराने माझा नवस पूर्ण केला.

 

एकता कपूर यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत एकता कपूर कारच्या पाठीमागे बसल्या असून पुढच्या सीटवरील इराणी यांच्याशी गप्पा मारल्या. त्यात इराणी म्हणाल्या की मी चार महिन्यांच्या रविसोबत पहिल्यांदाच सिदि्‌धविनायकाचे दर्शन घेतले. मी त्याची खूपच खास मावशी आहे.

First Published on: May 28, 2019 5:42 PM
Exit mobile version