प्रसिद्धी मिळाल्यामुळे १० वर्षांनंतर मुलीला आठवली आई

प्रसिद्धी मिळाल्यामुळे १० वर्षांनंतर मुलीला आठवली आई

सोशल मीडियावर कधी काय होईल हे सांगू शकतं नाही. असंच घडलं आहे हे रानू मंडल हिच्यासोबत. सध्या तिचा एका स्टेशनवर गाणं गातं असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे तिच्या आयुष्याला एक वेगळं वळणं मिळालं आहे. रानूचा गाणं गातं असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे बॉलिवूडचा दिग्गज संगीतकार व गायक हिमेश रेशमियाने आपल्या आगामी चित्रपटात तिला संधी दिली आहे. हिमेश रेशमियाने रानू गाणं गाऊन घेतानाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. यामुळे तिला प्रसिद्धी आणि पैसा मिळाला असला तरी रानूला आता मौल्यवान अशी भेट सोशल मीडियामुळे मिळाली आहे. रानूची मुलगी तब्बल दहा वर्षांनंतर तिच्याकडे परतली आहे.

रानूचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिच्या मुलीने तिचा शोध घेतला. त्यामुळे तब्बल १० वर्षांनंतर ती लेकीकडे परतली आहे. माझी मुलगी परत आल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. माझ्या दुसऱ्या आयुष्याला सुरुवात झाल्याचे रानूने सांगितलं आहे. पैसा आणि प्रसिद्धी मिळताच मुलीने आईकडे परत आल्याची नेटकरी सोशल मीडियावर टीका करत आहेत.

रानूचा हा व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर पोस्ट करणारा अतिंद्र चक्रवर्ती याने या टीकांवर त्याची प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी आज खूप खूश आहे. फक्त देवच जाणू शकतो की, मी का खूश आहे. आयुष्यात पैसा ही गोष्ट खूप मोठी नाही आहे. मी केलेल्या एका व्हिडिओमुळे रानू आज आपल्या मुलीला परत भेटली आहे.’

हिमेशच्या ‘हॅपी हार्डी और हिर’ या बॉलिवूड चित्रपटातील एका गाण्याचे पार्श्वगायन रानू करणार आहे. ‘तेरी मेरी कहानी’ हे गाणं गाताना या चित्रपटात ती दिसणार आहे.

First Published on: August 27, 2019 10:27 AM
Exit mobile version