सोनाली बेंद्र लवकरच भारतात परतणार

सोनाली बेंद्र लवकरच भारतात परतणार

सोनाली बेंद्र लवकरच भारतात परतणार

बॉलीवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेला कर्करोगाचा आजार झाला असल्याने ती परदेशात यावर उपचार घेत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सोनाली न्यूयॉर्कमध्ये घेत होती. मात्र आता ती लवकरच मायदेशी परतणार आहे. नुकतीच सोनालीने याबाबत एक इन्स्टाग्राम पोस्ट केली असून आपल्या देशात येणे हे तिच्यासाठी किती खास आहे हे तिने सांगितले आहे. तसेच मायदेशी काही काळ विश्रांती घेऊन ती पुन्हा पुढील उपचारांसाठी न्यूयॉर्कला जाणार असल्याचेही तिने सोशल मीडियातून तिच्या चाहत्यांना सांगितले आहे.

सोनालीची इन्स्टाग्रामवरील पोस्ट

सोनाली बेंद्रेने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट टाकली आहे. या पोस्टमध्ये तिने असे सांगितले आहे की, आपल्यावरील उपचारांचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून आता आपल्याला मायदेशात जाण्यास डॉक्टरांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे मी खूप खुश असल्याचे देखील तिने म्हटले आहे. तसेच आपल्या घरापासून दूर राहताना तिची मानसिक स्थिती कशी झाली याबद्दल देखील तिने लिहीले आहे. मात्र या अंतराने मला अनेक गोष्टी शिकवल्या आहेत. मात्र आता मी माझ्या मायदेशी येणार असल्याने मला खूप आनंद होत असून मी हा आनंद शब्दात मांडू शकत नसल्याचे सोनालीने सांगितले आहे. तसेच माझ्या घरी येण्यासाठी मी खूप उत्साही आहे.


वाचा – पहा किती बदलली सोनाली बेंद्रे!


हा लढा संपलेला नाही

सोनाली या आजाराशी झुंज देत आहे. मात्र तरी देखील मी अतिशय सकारात्मक असल्याचे मत तिने व्यक्त केले आहे. तसेच माझा अद्याप लढा संपलेला नसल्याचे देखील तिने व्यक्त केले आहे. या पोस्टसोबत सोनालीने आपला एक फोटोही शेअर केला आहे. त्यामुळे आता सोनालीचे नातेवाईक, मित्रमंडळी तिची आतुरतेने वाट पाहत आहेत.


वाचा – अभिनेत्री सोनाली बेंद्रेने दिला भावनिक संदेश


 

First Published on: December 2, 2018 5:53 PM
Exit mobile version