काय सांगता! वयाच्या १९ व्या वर्षी सोनम कपूरच वजन झालं होत ८६ किलो

काय सांगता! वयाच्या १९ व्या वर्षी सोनम कपूरच वजन झालं होत ८६ किलो

काय सांगता! वयाच्या १९ व्या वर्षी सोनम कपूरच वजन झालं होत ८६ किलो

बॉलिवूड अभिनेत्री आणि सुपरस्टार अनिल कपूर यांनी मुलगी सोनम कपूर (sonam kapoor ) फार कमी वेळात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. अभिनेता रणबीर कपूर सोबत ‘सावरिया’ या सिनेमातू सोनमने सिनेसृष्टीत पदार्पण केले. आपल्या स्टाईल आणि फॅशनमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या सोनम कपूरचे वजन ८६ किलो होते असे सांगितल्यास आश्चर्यच वाटेल. ज्या वयात मुली स्लिम ड्रिम होण्याच्या नादात असतात त्या वयात सोनम कपूर वाढलेले वजन कमी करत होती. वयाच्या १९ व्या वर्षी सोनमचे वजन ८६ किलो झाले होते. काय आहे सोनमच्या वजनामागची खरी गोष्ट जाणून घ्या. (sonam kapoor weight lose journey At the age of 19 Sonam Kapoor weighed 86 kg)

वयाच्या १९ व्या वर्षी सोनम पॉलीसिस्टिक ओवरी सिंड्रोम म्हणजचे pcosच्या समस्येशी सामना करत होती. त्यामुळे तिचे वजन हिशोबाच्या बाहेर वाढले होते. केवळ १९ व्या वर्षीच सोनमचे वजन ८६ किलो झाले होते. सोमनला जेव्हा सावरिया या सिनेमाची ऑफर आली तेव्हा तिने वाढलेले वजन कमी करण्याचा निर्णय घेतला. हेव्ही वर्कआउट आणि स्ट्रिक्ट डाएट फॉलो करुन सोनमने जवळपास ३५ किलो वजन कमी केले होते. ३५ किलो वजन सोनमने २ वर्षात कमी केले होते. सोनमने एका मुलाखतीत सांगितले होते की या काळात तिचे वाढलेले वजन कमी करण्यासाठी तिच्या आईची तिला सर्वात जास्त मदत झाली. सोनमला आवडणाऱ्या सगळ्या खाण्याच्या वस्तूंपासून तिच्या आईने तिला दूर ठेवले होते. या काळात सोनमने चॉकलेट्स, आयस्क्रिम्स, तळलेले पदार्थ खाणे सोडून दिले होते. सोनमच्या आईमुळे ती स्ट्रिक्टली डाएट फॉलो करु शकली.

सोनम तिच्या डाएटच्या काळात दर दोन तासांनी नट्स, सफरचंद आणि ड्राय फ्रूटचे सेवन करत होती. सोनमने सुरुवातीच्या काळात वेट लॉस करण्यासाठी कोमट पाण्यात लिंबू पिळून ते पाणी पिऊन केली होती. ब्रेकफास्टमध्ये सोनम ओट्समील आणि फळे खात होती. सोनम दररोज एक वाटी डाळ, एक वाटी भाजी, एक चपाती, सलाड , चिकन किंवा मच्छी खाते. सोनमने तेव्हा सुरु केले डाएट ती आजही फॉलो करतेय. त्यामुळे सोनम नेहमीच फ्रेश दिसत असते.


हेही वाचा – Video: पतीच्या निधनानंतरही मंदिरा बेदीने एकवटली हिंमत, तिरडी उचलून ठेवला नवा आदर्श

 

First Published on: June 30, 2021 7:06 PM
Exit mobile version