घरताज्या घडामोडीVideo: पतीच्या निधनानंतरही मंदिरा बेदीने एकवटली हिंमत, तिरडी उचलून ठेवला नवा आदर्श

Video: पतीच्या निधनानंतरही मंदिरा बेदीने एकवटली हिंमत, तिरडी उचलून ठेवला नवा आदर्श

Subscribe

जगाला निरोप घेणारा व्यक्ती निघून जातो, पण मागे सर्वांना एकटे सोडून जातो, असे म्हटले जाते. असेच आज अभिनेत्री मंदिरा बेदीसोबत घडले. मंदिरावर आज अचानक दुःखाचा डोंगर कोसळला. मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांचे आज सकाळी हृदयविकाराने निधन झाले. वयाच्या ४९ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सोशल मीडियावर राज यांच्या अंत्यविधीसंस्काराचे अनेक फोटो समोर आले आहेत. यामध्ये काही फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकालं की, मंदिरा आपल्या पतीची तिरडी उचलताना दिसत आहे.

भारतीय रुढी-परंपरेत महिलांनी कोणत्याही व्यक्तीच्या अंत्यविधीसंस्कारला जाऊ नये, असे मानले जाते. अशा रुढी-परंपरेचा विचार न करता मंदिराने आज पतीच्या अंत्यविधीची जबाबदारी उचलली. मंदिराने शेवटच्या क्षणापर्यंत पतीची साथ सोडली नाही. माहितीनुसार, बुधवारी सकाळी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास राज कौशल यांना हृदयविकाराचा झटका आला. तातडीने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. परंतु त्यांचा जीव वाचवता आला नाही आणि त्यांनी जगाचा अखेराचा निरोप घेतला. मंदिराच्या कुटुंबियांसाठी हा काळ खूप कठीण होता. अचानक राज कौशल यांच्या निधनामुळे संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली होती.

- Advertisement -

दरम्यान राज कौशल यांच्या अंत्यविधीसंस्कारचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये मंदिरा स्वतः आपल्या पतीला तिरडीला खांदा देताना दिसत आहे. दरम्यान जेव्हा रुग्णवाहिकेतून राज यांना स्मशानात घेऊन जात होते, त्यावेळेस इतर लोकांसोबत मंदिराने रुढी-परंपरेचा विचार न करता पतीच्या तिरडीला हात लावला.

 

View this post on Instagram

 

A post shared by BollyMetro (@bollymetro)

- Advertisement -

हेही वाचा – नसीरुद्दीन शाह यांच्या फुफ्फुसात पॅच, रुग्णालयात केलं दाखल


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -