सोनू सूद झाला देवदूत; दुबई एअरपोर्टवरील व्यक्तीचा वाचवला जीव

सोनू सूद झाला देवदूत; दुबई एअरपोर्टवरील व्यक्तीचा वाचवला जीव

अभिनेता सोनू सूदचा दयाळू स्वभाव सर्वांनाच ठाऊक आहे. कोरोना काळात सोनू सूदने अनेक गरजू व्यक्तींची मदत केली होती. तेव्हापासून तो सतत कोणत्याना कोणत्यातरी कारणामुळे चर्चेत असतो. याचं दरम्यान, सोनू सूदच्या प्रेमळ स्वभावाची झलक पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी सोनू सूद दुबईला गेला होता. दुबईहून परतत असताना दुबई एअरपोर्टवर त्याने असं काही केल ज्यानंतर एअरपोर्टवरील कर्मचारी आणि सोनू सूदचे चाहते देखील त्याचं कौतुक करु लागले.

काय आहे प्रकरण?
खरंतर, हे संपूर्ण प्रकरण दुबई एअरपोर्टवरील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोनू सूद दुबई एअरपोर्टवरील इमिग्रेशन काउंटरवर थांबला होता. तेवढ्यात एक व्यक्ती अचानक खाली कोसळला. तो व्यक्ती पूर्ण पणे बेशुद्ध झाला होता. इतक्यात सोनू सूदने त्या व्यक्तीला आधार देत त्याला सीपीआर दिलं, त्यानंतर काही वेळाने त्या व्यक्तीला शुद्ध आली.

सोनू सूदच्या या मदतीमुळे तिथले सर्वचजण त्याचं कौतुक करु लागले. तसेच त्या व्यक्तीने देखील सोनू सूदचे आभार मानले. हा किस्सा समोर येताच सोनू सूदचे चाहते त्याचे आणखी कौतुक करु लागेल आहेत. त्याचे चाहते त्याला खऱ्या आयुष्यातील हिरो असल्याचं म्हणत आहेत.

 


हेही वाचा :

RRR चित्रपटाचा जगभरात डंका; ‘बेस्ट अ‍ॅक्शन कोरिओग्राफी’साठी पटकावला तिसरा पुरस्कार

First Published on: January 18, 2023 11:02 AM
Exit mobile version