सोनू सूदच्या नावाने होत आहे फसवणूक; ट्विट करत केले सावध

सोनू सूदच्या नावाने होत आहे फसवणूक; ट्विट करत केले सावध

अभिनेता सोनू सूद

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. मात्र, या लॉकडाऊनमुळे अनेक मजूर वेगवेगळ्या राज्यात अडकले आहेत. यादरम्यान या अडकलेल्या मजुरांसाठी देवासारखा धावून आला तो म्हणजे बॉलिवूडचा अभिनेता सोनू सूद. पडद्यावरचा खलनायक हा खऱ्या आयुष्यातला रिअर हिरो झाला. त्याने अनेक मजुरांना त्यांच्या घरी सुखरुप पोहोचवले आहे. सोनू सूदच्या या कामाचे सर्वस्तरातून कौतुक केले जात असताना सोनू सूदच्या नावाने फसवणूक केली जात असल्याचा खुलासा स्वत: सोनू सूदने ट्विटरद्वारे केला आहे.

काय म्हणाला सोनू सूद

सोनू सूदने त्याच्या ट्विटमध्ये म्हटले आहे, ‘मित्रांनो काही लोक तुमच्या गरजेचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करत आहेत. ते तुमच्याशी त्यासाठी संपर्क करतील. जी सेवा मी श्रमिकांना देत आहे. त्यासाठी आम्ही कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारलेले नाही. जर कोणतीही व्यक्ती तुमच्याकडे माझ्या नावाने पैसे मागत असेल तर त्याला पैसे देऊ नका. लगेच आम्हाला कळवा किंवा जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करा’, असे आवाहन करण्यात आले आहे.


हेही वाचा – Video: सोनू सूदसाठी मजुरांना गायलं गाणं; सोनू म्हणतो, तुला पुन्हा मुंबईला उचलून आणू का?


First Published on: June 5, 2020 2:04 PM
Exit mobile version