सोनू सुद बनला पंजाब राज्याच्या लसीकरण मोहिमेचा ब्रॅंड अॅम्बेसेडर

सोनू सुद बनला पंजाब राज्याच्या लसीकरण मोहिमेचा ब्रॅंड अॅम्बेसेडर

Sonu Sood To Host Rodies : रोडीज शोमधून रणविजय आऊट, तर सोनू सूदची एन्ट्री

कोरोना व्हायरसचा जगभरामध्ये शिरकाव होऊन जवळ जवळ वर्ष पालटले आहे. तरीही कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. जगभरामध्ये कोरोना पुन्हा डोके वर काढत आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरस ची दुसरी लाट वेगाने पसरत आहे.कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ या मोहिमे अंतर्गत शासनाने अनेक निर्बंध लागू केले आहेत. लसीकरणाला सुरवात झाली असली तरीही इतर राज्यातही कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत आहे. पंजाब मध्येही लसीकरण मोहिमेला वेग यावा यासाठी प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता सोनू सुद याची ब्रॅंड अॅम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे.

 

पंजाब राज्याचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिह यांनी अभिनेता सोनू सुद याला आपल्या निवास स्थानी आमंत्रित करून भेट घेतली. तसेच त्यांनी लोकांना लसीकरणासाठी प्रेरित करायला सोनू सुद पेक्षा दूसरा कोणताही योग्य व्यक्ती नाही. असे देखील म्हंटले आहे. तसेच पंजाब मध्ये कोरोना लसीकरणा संदर्भात लोकांच्या मनात अनेक संभ्रम निर्माण झाले आहे. त्यांच्या शंकांचे सोनू सुद योग्यरित्या निरसन करू शकेल. गेल्या वर्षी सोनू सुद याने प्रवासी मजुरांना ज्या प्रकारे मदत केली त्याच्या विषयी लोकांमध्ये विश्वाशाची तसेच आदराची भावना जागृत झाली आहे. या दृष्टीकोणातून लोक कोरोना लसीकरणाचे महत्व समजू शकतील. जेव्हा सोनू सुद लोकांना लसीकरणाबाबत जन जागृती करेल तेव्हा लोक त्याच्यावर नक्की विश्वास ठेवतील. असे पंजाब च्या मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केले आहे.
अभिनेता सोनू सुद या नव्या जबाबदारीने चे पालन करण्यासाठी खूप उत्सुक असल्याचे सांगण्यात येते.” मी या कॅम्पेन चा मोठा भाग असून मी माझ्या राज्यातील लोकांचा जीव वाचवण्यास मदत करेन तसेच हातभार लावण्यास खूप धन्यता मानेन. ”असे सोनू सुद याने म्हंटले आहे.


हे हि वाचा – बाबो! करिश्मा कपूरची ‘सेम टू सेम’ कॉपी पाकिस्तानी हिना

First Published on: April 12, 2021 7:36 PM
Exit mobile version