घरमनोरंजनबाबो! करिश्मा कपूरची 'सेम टू सेम' कॉपी पाकिस्तानी हिना

बाबो! करिश्मा कपूरची ‘सेम टू सेम’ कॉपी पाकिस्तानी हिना

Subscribe

बॉलीवूडमध्ये नव्वदच्या दशकात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे करिष्मा कपूर. बॉलिवूडमधील सर्वाधिक हिट सिनेमांमध्ये करिष्माच्या अभिनयाची जादू पाहायला मिळाली. ९० च्या दशकात बॉलिवूड चित्रपटांमधील गाणी आणि त्यावरील करिष्माचा डान्स प्रेक्षकांच्या आजही पसंतीस उतरतो. करिष्माचा आजही मोठा चाहता वर्ग आहे. दरम्यान सोशल मीडियावर करिष्मा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. करिष्मासारख्या हुबेहुब दिसणाऱ्या एका मुलीमुळे सध्या करिष्मा चर्चेत आली आहे. करिष्मासारख्या दिसणाऱ्या सेम टू सेम कॉपी पाहून चाहते ही आश्चर्यचकित झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Heenaakh1 (@heenaakh1)

- Advertisement -

करिष्मासारख्या दिसणाऱ्या या मुलीचे नाव हिना खान असून ती पाकिस्तानी आहे. करिष्मा अनेक गाण्यांवर लिप्सिंग व्हिडिओ बनत त्या सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिच्या या व्हिडिओवर हिना करिष्मासारखा गेटअप करत व्हिडिओ तयार करत आहे. त्यामुळे नेटकरी आता हिनाला करिष्माची कॉपी करते ट्रोल करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Heenaakh1 (@heenaakh1)

- Advertisement -

हिनाचे टिक टॉकवर २४ लाख फॉलोवर्स आहेत. तर इस्ट्राग्रामवर ३५ हजार फॉलोअर्स आहेत. गोरा रंग, चेहऱ्यावरील हावभाव, घारे डोळे पाहता हिना सेम करिष्मा कपूर सारखीच दिसते. करिष्माचे अनेक चाहते तिच्या वेगवेगळ्या गाण्यावर लिप्सिंग करण्याची रिक्वेक्ट करत असतात. दरम्यान आता करिष्मा आणि हिनाच्या व्हिडिओवर चाहते मजेशीर भन्नाट कमेंटस करत आहेत. करिष्मासह यापूर्वी करिना, दीपिका, अनुष्कासारख्य़ा सेम दिसणाऱ्या मुलींचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Heenaakh1 (@heenaakh1)

करिष्माच्या वर्क फ्रिंटबद्दल सांगायचे झा्ल्यास करिष्मा कपूरने हिंदी ड्रामा वेब सीरिज मेंटलहुड या वेबसीरिजमधून डिजिटल विश्वास पदार्पण केले आहे. दरम्यान ९० च्या दशकात करिष्मा च्या हिरो नंबर वन, जुडवा, राजा बाबू, कुली नंबर वन या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. आजही प्रेक्षकांच्या मनात करिष्माचे विशेष स्थान आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -