Kiran Mane: आरोप करणाऱ्या महिला कलाकाराचे पती भाजपचे पदाधिकारी, अभिनेते किरण मानेंचा दावा

Kiran Mane: आरोप करणाऱ्या महिला कलाकाराचे पती भाजपचे पदाधिकारी, अभिनेते किरण मानेंचा दावा

Kiran Mane: आरोप करणाऱ्या महिला कलाकाराचे पती भाजपचे पदाधिकारी, अभिनेते किरण मानेंचा दावा

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून काही कलाकारांनी किरण मानेंवर आरोप केले आहेत तर काही कलाकारांनी किरण माने यांचे समर्थन केले आहे.  त्याचप्रमाणे टीव्ही 9 मराठीने दिलेल्या वृत्तानुसार, ‘आरोप करणाऱ्या महिला कलाकाराचे पती हे भाजपचे पदाधिकारी’, असल्याचा दावा देखील किरण माने यांच्याकडून करण्यात आला आहे. तसेच ‘माझ्यावर करण्यात आलेले गैरवर्तनाचे आरोप हे माझ्या विरोधातील षडयंत्र’, असल्याचा आरोप किरण माने यांनी केला आहे. राजकीय पोस्ट केली म्हणून मालिकेतून काढून टाकण्यात आले असा आरोप त्यांनी केला. चॅनेलकडून देखील त्यांना मालिकेतून काढून टाकण्याचे कारण स्पष्ट करण्यात आले मात्र किरण माने संदर्भात सुरू झालेला वाद आणखी चिघळत चालला आहे.

मुलगी झाली हो मालिकेतून अभिनेत्री शर्वनी पिल्ले म्हणजे माऊची आई हिचे पती हे उन्नी पिल्लाई हे वरळीतील भाजपचे पदाधिकारी असून अभिनेत्री शर्वनी पिल्ले ही मनसे चित्रपट सेनेची सभासद असल्याचे किरण माने यांनी म्हटले आहे. ‘एखादा राजकीय पक्ष माझ्या विरोधात उभा राहत असेल तर याच कारण काय असेल याचा लोकांनी विचार करावा. अशा आरोपांची स्क्रिप्ट कशी तयार झाली असेल हे पण बघा’, असे आरोप किरण माने यांनी म्हटले आहे.

महिलांशी गैरवर्तन केले या टायटलवर मोठी कारवाई करणार

‘महिलांशी गैरवर्तन करणे हे वाक्य ऐकून माणूस बॅकफूटवर जातो. महिलांची गैरवर्तन केले तर त्याविरोधात तक्रार का झाली नाही. त्या महिलांशी मी गैरवर्तन केले त्यांनी त्याचवेळी माझ्या कानाखाली का नाही मारली. जर महिलांना अपशब्द वापरले असतील तर इतर महिला माझी बाजू का घेत आहेत. मी त्यांच्या बापासारखा, भावासारखा असे त्या का म्हणत आहेत?’ असा सावल किरण माने यांनी केला आहे. त्यामुळे ‘या प्रकारात काही तरी गोम आहे हे सर्वांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. बऱ्याच जणांनी आता सेक्शुअल हरासमेंट, अश्लील चाळे अशाप्रकारे पोस्ट केल्या. महिलांशी गैरवर्तन केले या टायटलवर मी मोठी कारवाई करणार’, असल्याचे किरण माने यांनी सांगितले.

माझ्या गैरवर्तनाचे मुद्दे ‘पाचवी ड’ मधले

‘ज्या महिलांनी पुढे येऊन माझ्या विरोधात तक्रार केली. त्यांनी जे गैरवर्तनाचे मुद्दे सांगितले ते इयत्ता पाचवी ड च्या वर्गातील होते. प्रॉडक्शन हाऊसकडून पुढच्या मोठ्या कारस्थानाचा भाग सुरू झाला आणि अनेक कलाकारांना माझ्या विरोधात बोलण्याची सक्ती करण्यात आली आहे’,असे किरण माने यांनी म्हटले आहे. यासंदर्भात किरण माने यांनी फेसबुकवर भली मोठी पोस्ट देखील शेअर केली आहे.

 

चित्रा वाघ यांचा हल्ल्बोल 

किरण माने प्रकरणात अनेक राजकीय नेत्यांनी पाठींबा दिला आहे तर भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी किरण मानेंवर हल्लाबोल करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय. ‘मुलीच्या वयाच्या अभिनेत्रीशी गैरवर्तन करणाऱ्या किरण मानेला प्रोडक्शन हाउसनं हाकलून दिले आहे म्हणून मानेने नवे नाट्य उभे केले. महिलांचा विनयभंग व पंतप्रधनांवर विखारी टिका करणाऱ्या हरामखोराला सत्ताधारी पाठीशी घालता आहेत’, असा आरोप चित्रा वाघ यांनी केलाय. ‘किरण मानेचे बोलवते धनी कोण? या सोगांड्यावर कारवाई करा त्याला शिक्षा झालीच पाहिजे’, असे मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.


हेही वाचा – Kiran Mane : महिला अन् सहकलाकारांचा अपमान, वॉर्निंगनंतरही बेशिस्त वागणुकीमुळे केली हकालपट्टी – स्टार प्रवाह

First Published on: January 17, 2022 11:27 AM
Exit mobile version