‘कपिल शर्मा शो’मध्ये पुन्हा सुमोना चक्रवर्तीची एण्ट्री

‘कपिल शर्मा शो’मध्ये पुन्हा सुमोना चक्रवर्तीची एण्ट्री

'कपिल शर्मा शो'मध्ये पुन्हा सुमोना चक्रवर्तीची एण्ट्री

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय हिंदी कॉमेडी शो ‘द कपिल शर्मा शो’ चे (Kapil Sharma Show)  शुटिंग कोरोना काळात पूर्णपणे बंद होते. मात्र आता हा शो वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. नुकतचं या शोमध्ये कॉमेडियन सुदेश लहरी यांची एंट्री होणार असल्याची घोषणा झाली. (Sumona Chakraborty entry in Kapil Sharma Show)  तर भूरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती हीला शोमधून डच्चू देण्यात आल्याचे म्हटले गेले. यावरून बऱ्याच चर्चाही रंगल्या. मात्र शोच्या परीक्षक अर्चना पूरा सिंह यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम देत सुमोना चक्रवर्ती पुन्हा शोमध्ये झळकणार असल्याचे स्पष्ट केले.

द कपिल शर्मा शो’ चे शुटिंगदरम्याचा एक फोटो काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. या फोटोमधून सुमोना गायब होती. तर शोच्या प्रोमोतही सुमोना दिसली नाही. यावर अर्चना पूरा सिंह यांनी एका वृत्तसंस्थेच्या मुलाखतीत चाहत्यांनी लवकरचं एक सरप्राइज मिळणार असल्याचे सांगितले. तुम्हाला असे वाटत असेल की सुमोना शोमध्ये परत येणार आहे तर तुमच्यासाठी एक मोठं सरप्राइज आहे. असेही अर्चना म्हणाल्या.

मात्र सुमोना शोमध्ये आता एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांचे मनोरंजन करेल असेही अर्चना यांनी सांगितले. मात्र सुदेश लहरींच्या रुपाने या शोमध्ये एका नव्या कलाकाराची एंट्री होणार असून इतर सर्व स्टारकास्ट जुनीच असेल. या शोच्या शुटिंगसाठी आता नव्या सेटची उभारणी करण्यात आली असून कपिल कुटुंबात काही नवे पाहुणे जोडले जातील असेही अर्चना यांनी सांगितले. बहुचर्चित बेल बॉटम चित्रपटाच्या प्रमोशनसाठी लवकरचं अक्षय कुमार कपिल शर्मा शोच्या नव्या सिझनमध्ये पाहुणा कलाकार म्हणून येणार आहे.


हेही वाचा – ‘बिग बॉस ओटीटी’मध्‍ये सिद्धार्थ शुक्‍ला व शहनाज गिल यांची एंट्री

First Published on: August 13, 2021 8:22 PM
Exit mobile version