घरताज्या घडामोडी'बिग बॉस ओटीटी'मध्‍ये सिद्धार्थ शुक्‍ला व शहनाज गिल यांची एंट्री

‘बिग बॉस ओटीटी’मध्‍ये सिद्धार्थ शुक्‍ला व शहनाज गिल यांची एंट्री

Subscribe

'सिलसिला सिदनाज का' नंतर रोमँटिक जोडी बिग बॉस ओटीटीमध्ये

जगभरात लाखो प्रेक्षकांची मने जिंकलेले सिद्धार्थ शुक्‍ला व शहनाज गिल यांची वेगळी ओळख करून देण्‍याची गरज नाही. त्‍यांच्‍यामधील उत्‍साहवर्धक केमिस्‍ट्री व नि:स्‍वार्थ मैत्री ते एकत्र आल्‍यापासून दिसून आली आहे. सोशल मीडियावर देखील त्यांचे बरेच फॉलोवर्स आहेत. बिग बॉस ओटीटीमध्ये दोघांची एंट्री निश्चित झाली असून सिद्धार्थ शुक्‍ला व शहनाज गिल करणार घरामध्‍ये प्रवेश करणार आहेत. (Siddharth Shukla and Shahnaz Gill entry in ‘Bigg Boss OTT’)

- Advertisement -

चाहते नेहमीच त्‍यांना पडद्यावर एकत्र पाहण्‍याच्‍या संधीची वाट बघत असतात. त्‍यांची फिल्म ‘सिलसिला सिदनाज का’ प्रदर्शित झाल्‍यानंतर ही रोमँटिक जोडी वूटवरील ‘बिग बॉस ओटीटी’ मध्ये वीकेण्‍डला प्रवेश करणार आहे.

- Advertisement -

या जोडीच्‍या खूपच जवळ असलेला एक सूत्रधार म्‍हणाला, ”या रोमँटिक जोडीला नवीन स्‍वरूपासोबत स्‍टे कनेक्‍टेड थीम असलेल्‍या ‘बिग बॉस ओटीटी’मध्‍ये प्रवेश करताना पाहणे मजेशीर असणार आहे. सिदनाजने या घरामध्‍ये चांगले नाते निर्माण केले आहे. त्‍यांना घरातील इतर स्‍पर्धक व जोड्यांसोबत संवाद करताना पाहणे उत्‍साहवर्धक असणार आहे. हा वीकेण्‍ड पाहताना प्रेक्षकांना नक्कीच मजा येणार आहे.


हेही वाचा – राणी मुखर्जी ‘या’ सेलिब्रिटींची झाली शेजारी, मुंबईत खरेदी केलं अलिशान घर

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -