आथिया आणि केएल राहुलचं ‘या’ दिवशी होणार लग्न, सुनील शेट्टीने दिली माहिती

आथिया आणि केएल राहुलचं ‘या’ दिवशी होणार लग्न, सुनील शेट्टीने दिली माहिती

बॉलिवूड अभिनेत्री आथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटर केएल राहूल यांच्या लग्नाची चर्चा मागील अनेक दिवसांपासून चालू आहे. अनेकांचे त्यांच्या लग्नाकडे लक्ष लागून राहिले आहे. अशातच अभिनेता सुनिल शेट्टीने आथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहूलच्या लग्नाबाबत काही खुलासे केले आहेत. सोशल मीडियाद्वारे समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये सुनील शेट्टीला आथिया आणि राहूलच्या लग्नाबाबत प्रश्न विचारला गेला. त्यावेळी सुनिल शेट्टीने लग्नाच्या तयारी बाबत खुलासा केला आहे.

लग्नाच्या प्रश्नावर सुनिल शेट्टीचं उत्तर
सुनिल शेट्टीला प्रश्न विचारण्यात आला की, त्यावेळी तो म्हणाला की, “मला वाटतं हे सर्व मुलंच ठरवतील. राहुल सध्या आशिया कपमध्ये व्यस्त आहे. वर्ल्ड कप आहे. साउथ अफ्रिका टूर आहे, ऑस्ट्रेलिया टूर आहे. त्यामुळे जेव्हा त्यांना वेळ मिळेल त्या पद्धतीने ते लग्नाची तारीख ठरवतील. आता एका दिवसाच्या सुट्टीवर तर लग्न होऊ शकत नाही ना.”

मुंबईमध्ये होणार पार पडणार विवाह सोहळा

 


हेही वाचा :नवाजुद्दीन सिद्दीकीचा स्त्री वेशातील नवा लूक, अर्चना पूरणसिंहसोबत तुलना

First Published on: August 24, 2022 7:27 PM
Exit mobile version