अखेर ‘मोहल्ला अस्सी’च्या प्रदर्शनाल ग्रीन सिग्नल!

अखेर ‘मोहल्ला अस्सी’च्या प्रदर्शनाल ग्रीन सिग्नल!

मोहल्ला अस्सी

दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर ‘मोहल्ला अस्सी’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. सनी देओल आणि साक्षी तन्वर यांच्या मुख्य भूमिका या चित्रपटात आहेत. १६ नोव्हेंबरला ‘मोहल्ला अस्सी’ चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाला प्रदर्शनासाठी अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं होतं. अखेर या सगळ्या अडचणींवर मात करत ‘मोहल्ला अस्सी’ प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.

सेन्सॉर बोर्डाच्या कचाटयात ‘मोहल्ला अस्सी’

गेल्या तीन वर्षांपासून सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात ‘मोहल्ला अस्सी’ चित्रपट अडकलेला. जेव्हा हा चित्रपट ट्रिब्यूनलकडे गेला, तेव्हा त्यामध्ये १० कट्स सुचवण्यात आले होते. त्याचप्रमाणे मंदिर आणि शौचालय या शब्दांचा उल्लेख चित्रपटात टाळण्यास सांगितले होते. या सगळ्या कट्सनंतर चित्रपटातून २० मिनिटांचा भाग वगळावा लागला असता. त्यामुळे चित्रपटाच्या मूळ कथेलाच धक्का लागला असता. त्यामुळे या विरोधात निर्मात्यांनी नोव्हेंबर २०१६ ला उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

न्यायालयाच्या निर्णयाने दिलासा

दिल्ली उच्च न्यायालयाने ११ डिसेंबरला या प्रकरणी निर्णय दिला. सेन्सॉर बोर्डाने सुचवलेल्या १० कट्सपैकी ९ कट्स न्यायालयाने रद्द केले आहेत. त्यामुळे चित्रपटाच्या सेन्सॉर प्रमाणपत्राचा मार्ग मोकळा झाला आहे.

कांदबरीवरी आधारीत ‘मोहल्ला अस्सी’

काशीनाथ सिंग यांच्या ‘काशी का अस्सी’ या कादंबरीवर या चित्रपटाची कथा आधारीत आहे. या कादंबरीतील मुख्य पात्र तन्नी गुरू ही भूमिका सनी देओल साकारत आहे. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.२०११ मध्ये या चित्रपटाचं शुटिंग वाराणसीला सुरू झालं होतं. त्यानंतर ३० जून २०१५ ला चित्रपटाचं प्रदर्शन थांबवण्यात आलं. त्यानंतर १४ जून २०१६ला निर्मात्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. अखेर ३ वर्षानंतर चित्रपटाच्या प्रदर्शनाला ग्रीन सिग्नल मिळाला आहे.

First Published on: September 22, 2018 5:28 PM
Exit mobile version