CoronaVirus: प्रसिद्धीसाठी काहीही; सनी लिओनीनं मास्क म्हणून डायपर घातला

CoronaVirus: प्रसिद्धीसाठी काहीही; सनी लिओनीनं मास्क म्हणून डायपर घातला

CoronaVirus: हीच काय भलतचं! मास्क म्हणून लावला डायपर

जगभरात कोरोना व्हायरसच्या लढ्यात लोक स्वतःला घरात क्वारंटाईन करून घेत आहेत. अनेक सेलिब्रिटींनी देखील स्वतःला घरात क्वारंटाईन केल आहे. यादरम्यान सेलिब्रिटी नेहमी व्हिडिओ आणि फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर करत असतात. बॉलिवूडची सेक्सी आणि बॉल्ड अभिनेत्री सनी लिओनेने देखील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने अनेक प्रकारचे मास्क घातलेले दिसत आहेत. सध्या तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सनीने एका फोटोत डायपरचा मास्क घातला आहे. तिने घरातील विविध वस्तूंचा वापर करून मास्क घातले आहेत. तिने स्कार्फचा मास्क देखील घातला आहे. इमरजेंसी मास्क असल्याचे तिने म्हटले आहे.

सनीच्या चाहत्यांना या कल्पना आवडत असताना पश्चिम बंगालमधील एका व्यक्तीने हाच प्रकार केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो डायपरचा मास्क घालून बाहेर फिरत असताना दिसत आहे.

 

 

कोविड-१९ इंडिया ट्रॅकरच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत देशात कोरोनाचे १३ हजार २९२ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ४३२ कोरोना रुग्णांना मृत्यू झाला आहे. तसंच १ हजार ७३४ कोरोनाचे रुग्ण रिकव्हर झाले आहेत. जगातील कोरोनाग्रस्तांची संख्या २१ लाखांहून अधिक झाली आहे. तर मृतांची संख्या १ लाखांहून अधिक झाली आहे.


हेही वाचा – ‘काय स्टॉक संपला ना’? अभिनेता सुबोध भावेचा चाहत्यांना प्रश्न!


 

First Published on: April 17, 2020 7:53 AM
Exit mobile version