घरCORONA UPDATE‘काय स्टॉक संपला ना’? अभिनेता सुबोध भावेचा चाहत्यांना प्रश्न!

‘काय स्टॉक संपला ना’? अभिनेता सुबोध भावेचा चाहत्यांना प्रश्न!

Subscribe

सुबोधच्या या ट्विटला नेटकऱ्यांनी खूप प्रतिसाद दिला आहे.

देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. त्यामुळे सध्या सगळेच व्यवहार बंद आहेत. त्यामुळे मराठी चित्रमटसृष्टी, मालिका, बॉलिवूड सगळं काही बंद आहे. त्यामुळे सगळेच कलाकार घरी बसून आहेत. पण प्रत्येक कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहेत. दररोज लाईव्ह किंवा एखादी पोस्ट ते सोशल मीडियावर टाकत असतात. अभिनेता सुबोध भावेने नुकतंच ट्विट करत चाहत्यांना एक प्रश्न विचारला आहे. सुबोधच्या या प्रश्नामुळे सगळ्यांचे बुचकळ्यात पडले आहेत.

- Advertisement -

सुबोधने सोशल मीडियावर ‘काय स्टॉक संपला ना’ असा प्रश्न चाहत्यांना विचारला. या प्रश्नानंतर सगळेच बुचकळ्यात पडले. मात्र सुबोधचा हा प्रश्न विचारण्या मागचं कारण मात्र वेगळं आहे.  सुबोधने ट्विट करत विचारलं, ‘काय स्टॉक संपला ना? गैरसमज नको. घरी असलेल्या पुस्तकांचा विचारतोय मी. कुठलं पुस्तक वाचताय?’ याचसोबत तो सध्या काय वाचतोय, हेसुद्धा त्याने सांगितलं. ‘मी सध्या अमिशचं रावण, शेषराव मोरे यांचे ‘मुस्लिम मनाचा शोध’ आणि ऋषिकेश गुप्ते यांचं नवीन आलेला संग्रह’, असं तो म्हणाला.

- Advertisement -

सुबोधच्या या ट्विटला नेटकऱ्यांनी खूप प्रतिसाद दिला आहे. अनेकांनी तर आपण कोणते पुस्तक वाचतोय हे सुद्धा पोस्ट केलं. या पोस्टवरून लक्षात येतं की सतत शूटिंगमध्ये व्यस्त असणारे हे कलाकार आता क्वारंटाइनमध्ये आपल्या आवडीच्या गोष्टी करत आहेत. सुबोध प्रमाणे इतर कलाकार आहेत जे स्वयंपाक करणे, व्यायाम करणे अशा गोष्टीत मन रमवत आहेत.

View this post on Instagram

तुमची गोष्ट पाठवा असं आवाहन केल्यावर मला काही जणांनी मला गोष्ट वाचून पाठविली तर काहींनी फक्त ऑडिओ फाईल्स… शेवटी आता मीच आता आमच्या छोटू राधाची गोष्ट सॅम्पल म्हणून पाठवतोय… एन्जॉय ? #subodhbhave #youtube #story #marathi #marathistory #newproject #marathiactor #superstar #kids #forkids #storytelling  #goodmorning #saturday #firstlove #storytime #creativework #happykids #storysession #everysaturday #webseries #instagram #subodhdadachigoshta #sunday #yourstory #radhanachiket

A post shared by Subodh Bhave (@subodhbhave) on

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -