सुशांतच्या बहिणीने केले आत्महत्येच्या चार दिवस आधीचे Chat शेअर

सुशांतच्या बहिणीने केले आत्महत्येच्या चार दिवस आधीचे Chat शेअर

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची बहिण श्वेता सिंह कृती ही आपल्या भावासोबतच्या खास आठवणी वेळोवेळी सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच तिने सुशांतसोबतच्या संवादाचे स्क्रिनशॉट इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. सोबतच तिने दोन फोटोदेखील शेअर केले आहते. एक फोटो सुशांतच्या बालपणातील आहे तर एक श्वेताच्या लग्नातील फोटो आहे. श्वेताने सुशांतसोबत १० जून रोजी केलेल्या व्हॉट्सअॅप चॅटचे स्क्रिनशॉट शेअर केले आहेत. या संवादात श्वेताने त्याला तिच्या घरी राहण्यासाठी बोलावले आहे. त्यावर सुशांत म्हणतो की, खुप इच्छा आहे ताई. श्वेता त्याला उत्तर देते की, मग ये ना बाबू, एका महिन्यासाठी ये आणि चिल कर. तुला बरं वाटेल. मला माझ्या फ्रेंड्सना सांगायचे आहे की तू इथे आला आहेस.

श्वेताने या पोस्टसोबत म्हटले आहे की, तुला आपल्या कुटुंबियांबाबत नेहमी सांगितले आहे की आई बाबांना एक मुलगा हवा होता. यासाठीही आईचे पहिले मूल हे एक मुलगाच होते. मात्र त्याचा दीड वर्षाचा असतानाच मृत्यू झाला होता. त्यामुळे मी माझ्या मोठ्या भावाला कधीच भेटू शकते नाही. मात्र आई वडिल दुसऱ्या मुलाबाबत खुपच आशावादी होते. त्यांनी नवस केले, प्रार्थना केल्या. आणि माझा जन्म झाला. आईने मला लकी मानले आणि मला लक्ष्मी म्हटले. अखेर एक वर्षांनी तुझा जन्म झाला. तू खुपच गोंडस होतास. तुझे डोळे, स्माइल आकर्षित होती.

श्वेताने यापूर्वीही सुशांतबाबतच्या भावूक पोस्ट शेअर केल्या आहेत. सुशांतने १४ जून रोजी वांद्रे येथील राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली होती.

हेही वाचा – धक्कादायक! सॅनिटायझरने पेट घेतल्याने महिलेचा मृत्यू

First Published on: July 27, 2020 3:21 PM
Exit mobile version