सिद्धार्थच्या मृत्यूनंतर सुशांत सिंग राजपूत होतोय ट्रेन्ड,काय आहे कारण

सिद्धार्थच्या मृत्यूनंतर सुशांत सिंग राजपूत होतोय ट्रेन्ड,काय आहे कारण

बॉलिवूड(bollywood) अभिनेता आणि बिग बॉस (bigg boss 13 winner)विजेता सिद्धार्थ शुक्ला(Sidharath Shukla death) याचे ह्रदयविकाराच्या(heart attack) झटक्याने निधन झाले. सिद्धार्थने जगातून अचानक घेतलेल्या एक्झिटमुळे शोक व्यक्त केला जात आहे. तसेच हिंदी टेलिव्हिजनसह बॉलिवूडमधूनही हळहळ व्यक्त केली जात आहे. सिद्धार्थच्या अचानक जाण्याने चाहत्यांनाही मोठा धक्का बसलाय. बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan)याने देखील सिद्धार्थ शुक्लाच्या निधनावर दु:ख व्यक्त केलेय. मात्र दुसरीकडे सिद्धार्थच्या निधनानंतर अनेकांनी अभिनेता सुशांत सिंगच्या (Sushant Singh Rajput)आठवणींना देखील उजाळा दिला आहे.(sushant singh rajput trending after siddharths death)

दरम्यान सिद्धार्थच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर #SushantSingRajput असा ट्रेन्डही व्हायरल होत आहे. गेल्यावर्षी 14 जून रोजी सुशांतने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती आणि यानंतर बॉलिवूडसह राजकीय क्षेत्रात देखील एखच खळबळ उडाली. मात्र अजूनही सुशांतच्या मृत्यूचं रहस्य उलगडलेलं नाहिये. सुशांतचं पोस्टमार्टम देखील कूपर रुग्णालयात करण्यात आलं होतं,आणि सिद्धार्थला देखील मृत्यूनंतर कूपर रुग्णालयातच नेण्यात आलं आहे.

यानंतर आता सोशल मीडियावर चाहते सिद्धार्थ आणि सुशांत सिंग राजपूतची तूलना करताना दिसताय. फॅन्सच्या म्हणण्यानुसार, दोघांनाही एकाच रुग्णालयात नेण्यात आल. दोघेही यंग आणि टॅलेंटेड होते. तोघांच्याही नवाच्या पहिल्या शब्दामध्ये देखील साम्या आहेत. म्हणजेच सुशांत आणि सिद्धार्थ (S-S Sushan-Sidharath). दोघांनी आपल्या अभिनय कौशल्येच्या बळावर आउटसाइडर्स असूनही टेलिव्हिजनपासून ते बॉलिवडूच्या झगमगत्या दुनियेत प्रवेश केला.

सिद्धार्थ आणि सुशांत हे प्रचंड फिटनेस फ्रीक होते. सोशल मीडियावर नेहमी ते चाहत्यासोबत आपल्या आगामी प्रोजेक्ट संदर्भात माहिती देत असे. त्यांच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव करायचे. सिनेसृष्टीत अगदी लोकप्रिय होण्याच्या मार्गावर असतानाच दोघांचे असे अकाली जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.


हे हि वाचा- सिद्धार्थच्या मृत्यूमुळे शहनाजला धक्का; शहनाजच्या वडिलांनी केला खुलासा

First Published on: September 3, 2021 11:43 AM
Exit mobile version