घरट्रेंडिंगसिद्धार्थच्या मृत्यूमुळे शहनाजला धक्का; शहनाजच्या वडिलांनी केला खुलासा

सिद्धार्थच्या मृत्यूमुळे शहनाजला धक्का; शहनाजच्या वडिलांनी केला खुलासा

Subscribe

सिद्धार्थच्या अचानक एक्जिटमुळे अभिनेत्री शहनाज गिलला(shehnaaz gill) प्रचंड मोठ्ठा मानसिक धक्का बसल्याची माहिती समोर येत आहे.

बिग बॉस (Bigg Boss) फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन झालं आहे (siddharth shukla death). हृदयविकाराच्या झटक्यामुळे सिद्धार्थने वयाच्या ४०व्या वर्षी अखरेचा श्वास घेतला आहे. या घटनेनंतर संपूर्ण मनोरंजन सृष्टीत शोककळा पसरली असून अनेक कलाकारांनी हळहळ व्यक्त केली आहे. मात्र सिद्धार्थच्या अचानक एक्जिटमुळे अभिनेत्री शहनाज गिलला(shehnaaz gill) प्रचंड मोठ्ठा मानसिक धक्का बसल्याची माहिती समोर येत आहे.(siddharth shukla death shehnaaz gill father satement after death)

माहितीनूसार, शहनाज गिलचे वडिल संतोख सिंह सुख(Shehnaaz gill father) यांनी माध्यमांशी फोनवर बोलताना सांगितले आहे की, शेहनाज सध्या बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये. जे काही घडले त्यावर माझा देखील विश्वास बसत नाहीये.तसेच शेहनाज बद्दल विचारले असता संतोख सिंह म्हणाले की,मी शेहनाजशी फोनवर बोललो आहे. तीला प्रचंड मोठ्ठा धक्का बसला आहे. माझा मुलगा शाहबाज शेहनाजला भेटण्यासाठी मुंबईला गेला आहे आणि मी देखील नंतर जाणार आहे. ”

- Advertisement -

सिद्धार्थच्या निधनाची बातमी ऐकून शेहनाज शूटींग अर्धवट सोडून गेली असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच ती आता कोणाशीही बोलण्याच्या मनस्थितीत नाहिये.

बिग बॉसच्या घरात शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला यांची क्रेमिस्ट्री चाहत्यांना चांगलीच भावली होती. पहिल्यांदा बिग बॉसमध्ये दोघांची भेट होऊनही दोघांचे नाते इतके घट्ट झाले होते की त्यांच्यामध्ये होणाऱ्या वाद-विवाद, प्रेम,रुसणं -फुगणं याची चर्चा बिग बॉसच्या घराबाहे व्हायरल होत असे. बिग बॉसच्या घरात असताना सोशल मीडियावर दोघांच्या नावाचे अनेक फॅन पेजेस देखील चाहत्यांने तयार केले होते. #sidnazz या लोकप्रिय नावाने टॅग देखील तयार केले होते. सिद्धार्थ बिग बॉसचा विजेता झाल्यावर देखील शेहनाज आणि त्याची जोडी चाहत्यामध्ये इतकी लोकप्रिय झाली की अनेक म्यूझिक व्हिडिओमध्ये काम करण्याची ऑफर त्यांना येऊ लागली. इतकंच नाही तर त्यांची प्रत्येक गाणी हिट ठरत असून सर्व गाण्यावर मिलीयन व्ह्यूव्स मिळत असे.

- Advertisement -

हे हि वाचा – #SidharthShukla : सिद्धार्थ खूप लवकरं सोडून गेलास, नेहमी आठवणीत राहशील, सलमान खानचे भावनिक ट्वीट

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -