बिहारमधील चौकाला सुशांतच नाव, चाहत्यांनी अनोख्या पद्धतीने वाहिली श्रध्दांजली!

बिहारमधील चौकाला सुशांतच नाव, चाहत्यांनी अनोख्या पद्धतीने वाहिली श्रध्दांजली!

सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या ही त्याच्या चाहत्यांसाठी खूप धक्कादायक गोष्ट होती. त्यांच्या अचानक जाण्यानंतर चाहते त्याला वेगवेगळ्या पद्धतीने श्रध्दांजली वाहत आहेत. बिहारच्या पूर्णियामधील एका रस्त्याला व चौकाला सुशांतचं नाव देण्यात आलं आहे. या चौकाचं ना  फोर्ड कंपनी असं होतं. ते बदलून आता सुशांत सिंह राजपूत चौक नाव देण्यात आलं आहे.

सध्या या चौकाचे बदलेल्या नावाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. महापौर सविता सिंह यांनी नगरपालिकेकडून सुशांतला श्रद्धांजली वाहिली आणि भारत सरकारकडे सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटलं, “मला भारत आणि बिहार सरकारवर पूर्ण विश्वास आहे की सरकार सीबीआय चौकशीची परवानगी नक्की देईल.”

१४ जून रोजी सुशांतने मुंबईतल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येची घटना प्रत्येकाच्या मनाला चटका लावून गेली. या जगाला निरोप देऊन बरेच दिवस उलटून गेले आहे. सुशांतच्या मृत्यूने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. मात्र अद्याप त्याच्या आत्महत्येमागचे कारण समोर आलेले नाही. सुशांतने अचानक एक्झिट घेतल्याने त्याने खरंच डिप्रेशनमध्ये असल्याने स्वतःचे जीवन संपवले की त्याची कोणी हत्या केली, असे अनेक प्रश्न समोर आले आहे. परंतु पोलीस कोणत्याही ठाम निष्कर्षावर पोहोचलेले नाही. सुशांतच्या आत्महत्येसंदर्भात अनेकांची चौकशी सध्या होत आहे.


हे ही वाचा – अग्रिमा जोशुआनंतर ‘या’ मराठी अभिनेत्रीने केलं वादग्रस्त वक्तव्य, सोशल मीडियावर झाली ट्रोल!


First Published on: July 11, 2020 6:06 PM
Exit mobile version