कोरोना संकटात लोकांच्या हिंमतीचे कौतुक करत सुश्मिता सेनची भावनिक पोस्ट

कोरोना संकटात लोकांच्या हिंमतीचे कौतुक करत सुश्मिता सेनची भावनिक पोस्ट

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला नाकी-नऊ आणले आहे. आज जगभरामध्ये मृतांचा आकडा लाखोंच्या घरात पोहचला आहे. अनेक लोकांनी आपल्या जवळच्या व्यक्तीच्या अंतिम दर्शन आणि अंतिम संस्काराची विधी देखील करू शकले नाही.अशा स्थितीतही आपल्या जिवाची पर्वा न करता अनेक डॉक्टर्स,नर्स,पोलिस,अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी लोकांची मदत करत आहे. तसेच अनेक नागरिक लोकांची मदत करण्यासाठी पुढाकार घेत आहे. ही भयावह परिस्थिती पाहता आणि लोकांच्या हिंमतीची  दाद देत अभिनेत्री सुश्मिता सेन हिने सोशल मीडियावर अत्यंत भावनिक पोस्ट शेअर केली आहे. सुश्मिताने पोस्ट मध्ये लिहलं आहे की,” एका एका श्वासासाठी लोकांना लढतांना पाहून माझ मन तुटत आहे.आपल्या लोकांना गमावण्याचे दुख: , जीवंत राहण्यासाठी करावी लागणारी लढाई. मजुरांचे दुख: सगळे कोरोना योद्धा मेडिकल आणि वॉलंटियर म्हणून काम करत आहे.. या सर्वांमध्ये मानवतेची भावना कायम आहे. तसेच हे ऐकून अत्याधिक आनंद होतो की कोणत्याही अटी शिवाय फक्त आणि फक्त मानवतेच्या आणि साहानुभूतीच्या दृष्टीकोणातून या कठीण काळात सर्व स्तरावरून मदतीसाठी लोकं पुढे येत आहेत. आरोप -प्रत्यारोपाचा खेळ न खेळता प्रत्येक क्षणाचा वापर लोकांचे आयुष्य वाचवण्यासाठी करा. प्रत्येकाचे जीवन अमुल्य आहे. आपण याला मृतांचा आकडा न समझता याच्या आहारी जाऊ नये. मी खूप नशीबवान आहे,कारण माझे चाहते,मित्रपरिवार,हेल्थकेयर वर्कर्स माझ्या सभोवताली आहेत. जे न थकता दुसर्‍या लोकांनसाठी माझी मदत पोहचवण्या करिता तयार आहेत. प्रत्येकाला आयुष्य हे एकदाच लाभते,एकाच जीवन आहे. मी तुम्हा सर्वांना सलाम करते की तुम्हाला शक्य तितकी तुम्ही पूर्ण मदत करत आहात. याचा तुम्हाला अंदाजासुद्धा नसेल तुम्ही किती लोकांचे प्राण वाचवत आहात.

सुश्मिता सेन नेहमीच सोशलवर्क द्वारे लोकांच्या मदतीस धावून येत असते. वर्कफ्रंट बाबतीत सांगायचे झाल्यास सुश्मिता ओटीटी प्लॅटफॉर्म वरील ‘आर्या’ या प्रसिद्ध वेब सिरिज मध्ये झळकली होती. तसेच ‘आर्या’ वेब सिरिजचा पुढील भागात सुद्धा सुश्मिताची वर्णी लागली आहे.


हे हि वाचा – दिल्ली अहमदाबादच्या सरणावर IPL जोरात, केदार शिंदेंचे ट्विट चर्चेत

First Published on: May 3, 2021 1:53 PM
Exit mobile version