Suyash Tilak Wedding : सुयश टिळक- आयुषी भावे अडकले लग्नबंधनात

Suyash Tilak Wedding :  सुयश टिळक- आयुषी भावे अडकले लग्नबंधनात

Suyash Tilak Wedding : सुयश टिळक- आयुषा भावे अडकले लग्नबंधनात

प्रसिद्ध मराठमोळा अभिनेता सुयश टिळक नुकताच अभिनेत्री आयुषी भावेसोबत २१ ऑक्टोबरला विवाहबंधनात अडकला आहे. दोघांच्या लग्नातील काही फोटो सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. यात दोघांची जोडी खुपचं सुंदर दिसत आहे. चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

कोरोनामुळे काही मोजक्या मित्र मंडळी आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत त्यांनी लग्नगाठ बांधली आहे. त्यामुळे अगदी पारंपारिक पद्धतीने सुयश- आयुषीचा विवाह सोहळा पार पडला आहे. ७ जुलै रोजी सुयशने आयुषीसोबत साखरपुडा केला होता. सारखपुड्यापासूनचं सुयश आयुषी केव्हा लग्नबंधनात अडकणार याकडे चाहत्यांचे लक्ष होते. मात्र आज अखेर सुयश-आयुषीने एकमेकांच्या गळ्यात हार घालत चाहत्यांनी आनंदाची बातमी दिली.

अभिनेता सुयश टिळकने ‘तू तिथे मी या’ मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. या मालिकेमुळे सुयशला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. मात्र सुयशच्या खऱ्या आयुष्यातील आदिती कोण असेल याकडे चाहत्यांनी लक्ष होते. दरम्य़ान अभिनेत्री अक्षया देवधरसोबत त्यांच नातं जोडलं गेलं होतं. परंतु सुयशने प्रियसी आयुषीसोबतच्या साखपुड्याचे फोटो शेअर करत सर्वांना आश्चर्यचकित केले होतं. आयुषी भावे एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि उत्तम डान्सर आहे. लवकरचं ती चित्रपटांमध्येही झळकणार आहे.


Tabbar : ‘तब्‍बर’ मधून उलघडणार ‘फॅमिली मॅटर्स’चा थ्रिलिंग प्रवास

First Published on: October 21, 2021 4:39 PM
Exit mobile version