घरमनोरंजनTabbar : 'तब्‍बर' मधून उलघडणार 'फॅमिली मॅटर्स’चा थ्रिलिंग प्रवास

Tabbar : ‘तब्‍बर’ मधून उलघडणार ‘फॅमिली मॅटर्स’चा थ्रिलिंग प्रवास

Subscribe

कौंटुंबिक गुन्हेगारी विश्वातील रोमांचक प्रवास घडवणारा ‘तब्‍बर’ हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटातून आपल्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी एखादा व्यक्ती कोणत्या थराला जाऊ शकतो याचे चित्रण घडले. ‘तब्‍बर’ एका निवृत्त पोलिस कॉन्‍स्‍टेबलच्‍या जीवनप्रवासाला दाखवतो, जो त्‍याच्‍या कुटुंबाला दुर्दैवी घटनेच्‍या परिणामांपासून वाचवण्‍याकरिता मर्यादा ओलांडतो. पवन मल्‍होत्रा, सुप्रि‍या पाठक, गगन अरोरा, परमवीर चीमा, कंवलजीत सिंग आणि रणवीर शोरे सारखी तगडी स्टारकास्ट असलेला चित्रपट ‘तब्‍बर’ प्रेक्षकांना स्क्रिन्‍ससमोर खिळवून ठेवण्यात यशस्वी होत आहे.

या चित्रपटामध्‍ये असंतुष्‍ट पोलिसाची भूमिका साकारणारा परमवीर चीमा त्‍याच्‍या भूमिकेसाठी केलेल्‍या तयारीबाबत सांगत आहे. चीमा म्‍हणाला, ”पोलिसाची भूमिका साकारणे हे माझ्यासाठी स्‍वप्‍न पूर्ण झाल्‍यासारखे आहे. मला भूमिका मिळाल्‍यानंतर मी काही दिवस माझ्या वडिलांचे मित्र, जे एसीपी आहेत, त्‍यांच्‍यासोबत वेळ व्‍यथित करण्‍याचे ठरवले. कर्तव्‍यदक्ष पोलिस अधिका-यांसोबत राहण्‍यासह त्‍यांचे निरीक्षण करण्‍याच्‍या त्‍या दोन दिवसांनी मला भूमिकेचे बारकावे सादर करण्‍यास प्रेरित केले. सर्वात महत्त्वाचे म्‍हणजे मला पोलिसांना करावे लागणारे जलद विश्‍लेषण व निर्णय घेण्‍याची क्षमता समजली.”

- Advertisement -

शूटिंगदरम्‍यानचा आणखी एक रोचक किस्सा सांगताना तो म्‍हणाला, ”आम्‍ही रस्‍त्‍यांवर शूटिंग करत असताना मी खरा पोलिस असल्‍याचे सर्वांना वाटले. काही घटना घडल्‍या, ज्‍यामध्‍ये मला एका पोलिस अधिका-याने सॅल्‍यूट केला. त्‍याला वाटले की, मी त्‍याचा सहकारी आहे. खरेतर रस्‍त्‍यावरील प्रत्‍येक व्‍यक्‍तीला मी खरा पोलिस असल्‍याचे वाटले. एकूण त्‍यांचे धैर्य समजून घेत आत्‍मसात करण्‍याचा हा लक्षवेधक अनुभव ठरला आहे.”

अजितपाल सिंग यांचे दिग्‍दर्शन आणि अजय राय निर्मित ‘तब्‍बर’ ही जेएसआर पि‍क्‍चर्सची सिरीज आहे. हर्मन वडाला व संदीप जैन यांचे लेखन असलेल्‍या या सिरीजच्या संगीत निर्मात्या स्‍नेहा खानवलकर आहेत.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -