Swapnil Joshi : स्वप्नील जोशीने घेतलं रामलल्लाचं दर्शन

Swapnil Joshi : स्वप्नील जोशीने घेतलं रामलल्लाचं दर्शन

मराठी सिनेसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून स्वप्निल जोशी ओळखला जातो. बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या स्वप्नीलने आज मराठी मालिका, चित्रपट, सोबतच वेबसिरीज मध्ये देखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. 1986 मध्ये त्याने रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेत स्वप्नील जोशीने ‘कुश’ची भूमिका साकारली होती. यानंतर त्याला रामानंद सागर यांचा शो ‘कृष्णा’मध्ये मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर स्वप्नीलने टीव्हीवरून मोठ्या पडद्यावरही प्रवेश केला.

22 जानेवारी 2024 ला अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. हा सोहळा समस्त भाविकांसाठी खूप खास असून अयोध्येत मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. या सोहळ्याला अनेक बॉलिवूडच्या कलाकारांनी हजेरी लावली होती. अशातच आता मराठमोळ्या स्वप्नील जोशीनेही रामलल्लाचे दर्शन घेतले आहे. याबद्दल स्वप्नीलने आपल्या भावना व्यक्त करत त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

स्वप्नीलने पुढे लिहिलं, “काही दिवसांपूर्वी अयोध्येला जाण्याचा योग जुळून आला आणि माझ्याबरोबर होता माझा मित्र सौरभ गाडगीळ. आम्हा दोघांना आणि इतर काही मित्रमंडळींना प्रभूंच्या दर्शनाचं सौभाग्य लाभलं. प्रभूंचं दर्शन, शरयु नदीची आरती, हनुमान गढीचं दर्शन, अयोध्येतलं ते प्रसन्न वातावरण, ती सकारात्मकता… सगळं सगळं मनाला फार उत्साह आणि ऊर्जा देणारं होतं! हा मंत्रमुग्ध करणारा अनुभव इथे व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे आज शब्द नाहीत, पण सरतेशेवटी, ‘याजसाठी केला होता अट्टाहास’ असं वाटलं! प्रभू श्रीरामचंद्रांची कृपा आपल्या सगळ्यांवर सदैव राहो हीच प्रार्थना ! || जय श्रीराम || “

______________________________________________________________________

हेही वाचा : Vidya Balan : “सर्व स्टार किड्स…” नेपोटिज्मवर विद्या बालन स्पष्टच म्हणाली

First Published on: April 13, 2024 5:33 PM
Exit mobile version