स्वरा भास्करने दिला सुखद धक्का; सपा नेत्यासोबत थाटला संसार

स्वरा भास्करने दिला सुखद धक्का; सपा नेत्यासोबत थाटला संसार

सध्या बॉलिवूडमध्ये देखील लग्नाचा ट्रेंड सुरु आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी कियारा-सिद्धार्थचं लग्न पार पडलं त्याआधी आथिया आणि केएल राहूल देखील विवाहबंधनात अडकले होते. अशातच आता बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने गुरुवारी अचानक तिच्या लग्नाबाबत खुलासा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. खरं तर, स्वराचं लग्न 6 जानेवारी रोजी झालं होतं. मात्र, नुकताच तिने लग्नाबाबत खुलासा केला आहे. स्वराने समाजवादी पक्षाचा नेता फहाद जिरार अहमदसोबत कोर्ट मॅरेज केलं आहे. तिच्या लग्नाचे फोटो तिने स्वतः तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करुन चाहत्यांना ही बातमी दिली आहे.

स्वरा भास्करने दिली आनंदाची बातमी

4 वर्षांपेक्षा लहान पती

स्वरा भास्करने काल फहाद जिरार अहमदसोबत साध्या पद्धतीने कोर्ट मॅरेज केलं. स्वराचा पती तिच्या पेक्षा वयाने 4 वर्षांपेक्षा लहान आहे. तिचा पती समाजवादी पक्षाचा नेता आहे. त्यांची पहिली भेट 2019 मध्ये झालेल्या आंदोलनात झाली. तिथेच त्यांची चांगली ओळख झाली. पुढे हळूहळू मैत्री, त्यानंतर प्रेम आणि आता त्याचे रुपांतर लग्नात झाले आहे.

 


हेही वाचा :

कुणाल खेमू दिग्दर्शित ‘मडगाव एक्सप्रेस’चे शूटिंग झाले पूर्ण

First Published on: February 17, 2023 8:47 AM
Exit mobile version