Loop Lapeta: लूप लपेटाचा ट्रेलर आऊट, तापसी अन् ताहिर राज भसीन मुख्य भूमिकेत

Loop Lapeta:  लूप लपेटाचा ट्रेलर आऊट, तापसी अन् ताहिर राज भसीन मुख्य भूमिकेत

Loop Lapeta: लूप लपेटाचा ट्रेलर आऊट, तापसी अन् ताहिर राज भसीन मुख्य भूमिकेत

मुंबई: Loop Lapeta:  ओभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee pannu)  आणि अभिनेता ताहिर राज भसीन ( tahir raj bhasin)  यांचा बहुप्रतिक्षीत लूप लापेटा (Loop Lapeta)  या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ४ फेब्रुवारीला हा सिनेमा प्रेक्षकांना नेटफ्लिक्स प्रीमियरवर पहायला मिळणार आहे. आकाश भाटीया दिग्दर्शित लूप लपेटा हा सिनेमा जर्मन सिने निर्माता टॉम टाइक्वेरच्या १९९८ मधील रन लोला रन या सिनेमाचा हा हिंदी रिमेक असणार आहे. जर्मनमधील हा सर्वांत क्लासिक सिनेमा म्हणून ओळखला जातो. सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर ट्रेलर सोशल मीडियावर प्रचंड शेअर करणार आलाय. 50 लाख 50 मिनिटे. वेळेवप शर्यत जिंकू शकाल? की सर्वकाही गमवाल? हॅशटॅग लूपलपेटा असे म्हणत नेटफ्लिक्स इंडियाने सिनेमाचा ट्रेलर शेअर केला आहे.

तापसीने या आधी सोशल मीडियावर सिनेमाचे पोस्टर शेअर करत सिनेमाच्या ट्रेलर रिलीजची घोषणा केली होती. त्यानूसार १३ जानेवारीला सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तापसीने तिच्या पोस्टमध्ये म्हटले होते की, हॅड्स अप! फ्रीज! का! कारण आमचा ट्रेलर आजा रिलीज होणार आहे, म्हणत तिने सिनेमातील ताहिर भसीन सोबतचा फोटो शेअर केला होता.

तापसीने सिनेमा विषयी माहिती दिली ती म्हणाली, लूप लपेटा हा सिनेमा भारतीय सिनेमातील आतापर्यंत वाचला गेलेला किंवा पाहिला गेलेला सर्वांत विचित्र कॉमेडी असलेला सिनेमा आहे. लूप लपेटा नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे याचा मला आनंद आहे आणि माझी अशी इच्छा आहे की, प्रेक्षकांनी हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवरच पहावा.

लूप लपेटा म्हणजे काय?

सिनेमाचे नाव ऐकल्यानंतर लूप लपेटा म्हणजे काय असा प्रश्न सर्वांना पडला आहे. सिनेमाच्या टायटलनेच प्रेक्षकांना काही वेळ विचार करायला भाग पाडले आहे. यावर तापसीने म्हटले आहे की, अनेक जण बऱ्याच दिवसांपासून सिनेमाच्या टायटल विषयी अनेक प्रश्न विचारत आहेत. टायटल फार कॅची आणि नवीन असायला हवे होते असे देखील अनेकांनी सुचवले. मात्र आम्हा सिनेमाचे टायटल फार सिंपल ठेवायचे होते. सिनेमाचे हे टायटल आमच्या लूक आणि फिलला पूर्णपणे न्याय देते, असे तापसीने म्हटले. लूप लपेटा म्हणजे काय याविषयी तापसीने सांगितले, लूप म्हणजे एक गोष्ट जी वारंवार होते आणि लपेटा म्हणजे तुम्ही एखादा माल किंवा वस्तू गुंडाळली.

लूप लपेटा हा सिनेमा लॉकडाऊन दरम्यान शूट करण्यात आली होती. सिनेमाने शूटींगवेळी देखील अनेक आव्हानांचा सामना केला. तापसीने याविषयी म्हटले, या काळात आऊटडोर शूट करणे फार कठीण होते. गोव्यात आम्ही शूटींग करत होतो. त्यावेळी गोव्यात लॉकडाऊन असल्याने अनेक गोष्टी आम्हाला काही लिमिटमध्ये मिळत होत्या. सेटवर निर्मात्यांनी आमची पूरेपूर काळजी घेतली. आम्ही आजारी पडणार याकडे ते प्रामुख्याने लक्ष देत होते.


हेही वाचा – भूमी पेडणेकरच्या बहुचर्चित ‘द लेडी किलर’ ची घोषणा, अर्जुन कपूरसोबत करणार स्क्रीन शेअर

 

First Published on: January 13, 2022 2:58 PM
Exit mobile version