झोयाने पुन्हा केलं प्लाझ्मा डोनेट, आदित्य ठाकरेंनी ट्विट करून केलं कौतुक!

झोयाने पुन्हा केलं प्लाझ्मा डोनेट, आदित्य ठाकरेंनी ट्विट करून केलं कौतुक!

zoya morani

बॉलिवूडचे सेलिब्रिटसुद्धा या कोरोना विषाणूच्या संकटात एकत्रित येऊ लढा देत आहे. या कोरोनाच्या संकटात अनेक बॉलिवूड कलाकरांनी मदतीचा हात पुढे केला आहे.  काही दिवसांपूर्वी चित्रपट निर्माते करिम मरोनी यांची मुलगी झोया मोरानीला करोना झाल्याचे समोर आले होते. पण झोयाने करोनावर मात केली. तिची दुसरी करोना चाचणी निगेटीव्ह आली. त्यानंतर तिने करोनाशी झुंज देणाऱ्या व्यक्तींसाठी प्लाझ्मा डोनेशन केले होते. आता पुन्हा एकदा झोया प्लाझ्मा डोनेट करत आहे.  झोयाने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे.

झोयाने कोरोनावर मात केल्यानंतर ती आता कोरोनाग्रस्तांना जमेल त्या पद्धतीने मदत करत आहे. प्लाझ्मा थेरपीमुळे गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होत असल्यामुळे तिने रक्त दान करण्याचा निर्णय घेतला होता. आता पुन्हा एकदा तिने मदतीचा हात पुढे केला आहे. नुकताच झोयाने सोशल मीडिया पोस्टद्वारे दुसऱ्यांदा प्लाझ्मा डोनेट केल्याचे सांगितले आहे.

अभिनेत्री झोया मोरानीसह तिची बहीण शाजा मोरानी आणि वडील करीम मोरानी याना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना मुंबईच्या नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर एक आठवड्यानंतर त्यांना डिस्चार्ज दिला आहे. सध्या मोरानी कुटुंब घरी आयसोलेशनमध्ये आहेत.

अशी होते प्लाझ्मा थेरपी

विशिष्ट रोगातून बऱ्या झालेल्या रुग्णाच्या रक्तातील प्लाझ्मा त्याच आजाराच्या अन्य रुग्णांच्या शरीरात वापरला जातो. प्लाझ्मामध्ये आपल्या रक्तपेशी असतात. त्यात अ‍ॅण्टिबॉडीजदेखील असतात.

आदित्य ठाकरे ने मानले आभार

आदित्य ठाकरेने ट्विट करून झोयाचे आभार मानले आहेत.


हे ही वाचा – कोरोनाचा काही तासात मिळणार रिपोर्ट, चाचणीही होणार केवळ २०० रूपयात!


 

First Published on: May 28, 2020 10:38 AM
Exit mobile version