Video: अंकिता लोखंडेच्या ‘अरे रे आरे क्या हूआ’ गाण्यावर दिलखेच अदा

Video: अंकिता लोखंडेच्या ‘अरे रे आरे क्या हूआ’ गाण्यावर दिलखेच अदा

Video: अंकिता लोखंडेच्या 'अरे रे आरे क्या हूआ' गाण्यावर दिलखेच अदा

टेलिव्हिजन आणि बॉलिवूड विश्वात आपल्या अभिनयाने ओळख निर्माण करणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे या दिवसात सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. सध्या चाहत्यांसोबत कनेक्ट राहण्यासाठी अनेक डान्स व्हिडिओ अंकिता सोशल मीडियावर शेअर करत आहे. नुकताच तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत अंकिता माधुरी दीक्षितच्या ‘अरे रे अरे’ (Are Re Are Song) या गाण्यावर दिलखेच अदांमध्ये डान्स करताना दिसत आहे.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अंकिताने ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून टेलिव्हिजन विश्वात पदार्पण केले होते. या मालिकेत अंकिता सुशांत सिंह राजपूत सोबत प्रमुख भूमिकेत होती. ‘पवित्र रिश्ता’ व्यतिरिक्त अंकिता ‘एक थी नायका’ आणि ‘शक्ति-अस्तित्व के एहसास’ यांसारख्या मालिकेत तिने काम केले आहे. गेल्या वर्षी अंकिताने कंगना रनौतच्या ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झाशी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर ती ‘बागी ३’मध्ये अंकिता दिसली होती.


हेही वाचा – अनिता हसनंदानीनं दिली गुडन्यूज, एकताने अनोख्या अंदाजात दिल्या शुभेच्छा


 

First Published on: February 10, 2021 7:22 PM
Exit mobile version