तेलुगू अभिनेता पोसानी कृष्णा मुरली यांना तिसऱ्यांदा कोरोना

तेलुगू अभिनेता पोसानी कृष्णा मुरली यांना तिसऱ्यांदा कोरोना

प्रसिद्ध तेलुगू अभिनेता आणि पटकथा लेखक पोसानी कृष्णा मुरली यांची तिसऱ्यांदा कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पोसानी कृष्ण मुरली पुण्यात त्यांच्या एका चित्रपटाचे शूटिंग करत होते, तिथून ते हैदराबादला परतले मात्र हळूहळू त्यांना अधिक अस्वस्थ वाटू लागले. कोरोना विषाणूची लक्षणे दिसून आली तेव्ही त्यांनी डॉक्टरांशी संपर्क साधला. आरटी-सीपीआर चाचणी केल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. आता त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले आहे.

पोसानी कृष्णा मुरली हे तिसऱ्यांदा कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. याआधी देखील कोरोनाच्या दोन लाटांमध्ये ते कोरोना पॉझिटिव्ह होते.

 


हेही वाचा :

मी माझ्या मुलांना चित्रपटसृष्टीपासून लांब ठेवतो… रितेश देशमुखचा खुलासा

First Published on: April 15, 2023 4:37 PM
Exit mobile version