Thar Trailer : अनिल कपूर अन् हर्षवर्धन कपूरच्या सस्पेंस, थ्रिलिंग ‘थार’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

Thar Trailer : अनिल कपूर अन् हर्षवर्धन कपूरच्या सस्पेंस, थ्रिलिंग ‘थार’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

Thar Trailer : अनिल कपूर अन् हर्षवर्धन कपूरच्या सस्पेंस, थ्रिलिंग 'थार' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

बॉलिवूडचा यंग मॅन अभिनेता अनिल कपूर आणि त्याचा मुलगा हर्षवर्धन कपूर लवकरचं थार या चित्रपटात एकत्र दिसणार आहे. हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म Netfflix वर प्रदर्शित होणार आहेय ज्याचा पहिला ट्रेलर आज 18 एप्रिल रोजी रिलीज झाला आहे. सप्सेंस आणि थ्रिलिंगने भरलेल्या या ट्रेलरमध्ये अनिर कपूर एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसतोय. तर त्याच्यासोबत हर्षवर्धन एका छोट्या व्यावसायिकाच्या रुपातील स्मगलरच्या भूमिकेत दिसतोय.

थार चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात एका ओसाड वाळवंटापासून होतेय. जिथे अनिक कपूर एका हत्येचा तपास करताना दिसतोय. त्याच्यासोबत सतीश कौशिक हवालदाराच्या भूमिकेत दिसतोय. यानंतर हर्षवर्धनची एन्ट्री होते. जो स्वत:ला अँटिक बिझनेस मॅन म्हणून संबोधतो. पण त्याच्या पात्राची कथा खूप गुंतागुंतीची आणि सस्पेन्सने भरलेली आहे. तर अभिनेत्री फातिमा सना शेख एका राजस्थानमधील खेड्यातील मुलीची भूमिका साकारतेय. जी हर्शवर्धनच्या व्यक्तिमत्त्वाने खूप प्रभावित झाली आहे आणि तिला त्याच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करताना दिसतेय.

या चित्रपटाच्या दोन मिनिटांच्या ट्रेलरमधून थार चित्रपटाची कथा तस्करी आणि त्याच्याशी संबंधित गुन्हेगारीभोवती फिरणारी असल्याचे म्हटले जातेय. हा सस्पेन्स, थ्रिलर आणि रहस्याने भरलेल्या चित्रपटाची कथा 80 च्या दशकावर आधारित आहे.

अनिल कपूरच्या फिल्म कंपनीच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती होणार असून राज सिंग चौधरी याचे दिग्दर्शन करणार आहेत. थार हा चित्रपट 6 मे 2022 रोजी नेटफ्सिक्सवर प्रदर्शित होणार आहे. दरम्यान हर्षवर्धन कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास त्याने 2015 मध्ये रिलीज झालेल्या मिर्झ्या या चित्रपटातून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली, ज्याचे दिग्दर्शन राकेश प्रकाश मेहरा यांनी केले होते. त्यानंतर तो भावेश जोशी सुपरहिरो आणि एके vs एके या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. तर आता तो थार या चित्रपटात अँग्री यंग मॅनच्या भूमिकेत झळकणार आहे.


पद्मश्री विजेते संगीतकार प्रफुल्ल कर यांचे निधन; पीएम मोदींनी व्यक्त केला शोक

First Published on: April 18, 2022 4:32 PM
Exit mobile version