घरमनोरंजनपद्मश्री विजेते संगीतकार प्रफुल्ल कर यांचे निधन; पीएम मोदींनी व्यक्त केला शोक

पद्मश्री विजेते संगीतकार प्रफुल्ल कर यांचे निधन; पीएम मोदींनी व्यक्त केला शोक

Subscribe

भारतातील प्रसिद्ध ओडिसा संगीतकार आणि पद्मश्री पुरस्कार विजेते प्रफुल्ल कर यांचं निधन झालं आहे. रविवारी वयाच्या 83 व्या वर्षी राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. संगीतकार प्रफुल्ल कर यांच्या निधनामुळे मनोरंजन विश्वास शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी प्रफुल्ल कर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, पुरी स्वर्गद्वार येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी प्रताप जेना आणि समीर रंजन दास हे दोन मंत्री पुरीतील अंत्यसंस्काराच्या स्थळी उपस्थित राहणार आहेत.

- Advertisement -

पीएम मोदींसह अनेक सेलिब्रिटींनी व्यक्त केला शोक

कर यांनी 70 हून अधिक ओडिसा चित्रपटांना संगीत दिले आणि अनेक चित्रपट, अल्बम आणि रेडिओ कार्यक्रमांना आपला आवाज दिला. ‘कमला देश राजकुमार’ या गाण्याने ते घरोघरी प्रसिद्ध झाले. ही दु:खद बातमी समजताच विविध क्षेत्रातील लोक त्यांच्या घरी जाऊन अंत्यदर्शन घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, ओडिशाचे राज्यपाल गेनेशी लाल, मुख्यमंत्री नवीन पटनायक, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि अनेक मान्यवरांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.

- Advertisement -


पंतप्रधानांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “प्रफुल्ल कर जी यांच्या निधनाने खूप दु:ख झाले आहे. ओडिसा संस्कृती आणि संगीतातील त्यांच्या भरीव योगदानासाठी त्यांचे स्मरण केले जाईल. ते अष्टपैलुत्वाने समृद्ध होते आणि सर्जनशीलता त्याच्या कामातून दिसून येते. त्यांच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांसाठी माझ्या संवेदना. ओम शांती.” कर यांच्या निधनाने ओडिसा संगीत उद्योगातील एका युगाचा अंत झाल्याचे म्हणत पटनायक म्हणाले की, त्यांच्या अद्वितीय संगीत निर्मितीसाठी ते नेहमीच लोकांच्या हृदयात असतील.

मिळालेल्या माहितीनुसार, 1939 मध्ये जन्मलेल्या कर यांच्या पश्चात पत्नी मनोरमा आणि तीन मुले आहेत. ते एक कुशल संगीतकार, लेखक आणि स्तंभलेखक होते. कला आणि संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना 2015 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.


रणबीर आलियानंतर कपूर कुटुंबीयात पुन्हा वाजणार शहनाई; फोटोमधून झाले उघड…

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -