53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून होणार सुरुवात

भारताचा 53 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यावर्षी गोव्यामध्ये आयोजित केला जाणार आहे. याचे उद्धाटन 20 नोव्हेंबर म्हणजेच आजपासून सुरु होणार आहे. सध्या याची जोरदार तयार सुरु असून या सोहळा गोव्यातील प्रमुख चौकात पणजीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये अनेक बॉलिवूड कलाकार सहभागी होणार आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्धाटन होणार आहे. तसेच गोव्याचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री देखील याठिकाणी उपस्थित राहणार आहे.

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच पाच मराठी चित्रपट

20 ते 28 नोव्हेंबरपर्यंत पार पडणार महोत्सव
गोव्यात पार पडणाऱ्या या महोत्सवामध्ये मराठी, हिंदी भाषेसह दाक्षिणात्य चित्रपटांचे खास चित्रीकरण देखील दाखवले जाणार आहेत. हा महोत्सव 8 दिवस सुरु असणार आहे. या महोत्सवामध्ये अनेक दिग्गज कलाकार उपस्थित राहणार आहेत.

 


हेही वाचा :

धोंडी – चंप्याच्या प्रेम कथेचे हटके मोशन पोस्टर प्रदर्शित

First Published on: November 20, 2022 10:42 AM
Exit mobile version