घरमनोरंजनधोंडी - चंप्याच्या प्रेम कथेचे हटके मोशन पोस्टर प्रदर्शित

धोंडी – चंप्याच्या प्रेम कथेचे हटके मोशन पोस्टर प्रदर्शित

Subscribe

16 डिसेंबर रोजी धोंडी-चंप्याची अनोखी प्रेमकहाणी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

‘धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून आता या चित्रपटाचे नवीन पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे. रेडा आणि म्हशीची जगावेगळी प्रेमकहाणी असणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन ज्ञानेश भालेकर यांनी केले आहे. या चित्रपटात भरत जाधव, वैभव मांगले, सायली पाटील आणि निखिल चव्हाण य कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. प्रभाकर भोगले यांच्या कथेवरून प्रेरित होऊन केलेल्या या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद ज्ञानेश भालेकर आणि सागर केसरकर यांचे आहेत.

हे ही वाचा – मुलीच्या कॉस्मेटिक सर्जरीच्या अफवांवर; काजोलने दिलं सडेतोड उत्तर

- Advertisement -

पहिल्या पोस्टरपासूनच या चित्रपटाविषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता होती. त्यात आता या नवीन मोशन पोस्टरने ही उत्सुकता अधिकच वाढवली आहे. यात धोंडी आणि चंप्याला मुंडावळ्या बांधलेल्या दिसत असून ते लग्नासाठी आतुर असल्याचे दिसते आहे. या पोस्टरवरून हा एक धमाल विनोदी सिनेमा असल्याचे कळते. थोडीशी हटके कथा असणाऱ्या या चित्रपटातील धोंडी आणि चंप्याची प्रेमकहाणी यशस्वी होणार का, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना काहीशी प्रतीक्षा करावी लागणार आहे. 16 डिसेंबर रोजी धोंडी-चंप्याची अनोखी प्रेमकहाणी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक ज्ञानेश भालेकर म्हणतात, “हा एक जबरदस्त विनोदी चित्रपट असून धोंडी चंप्याची एक आगळीवेगळी प्रेमकहाणी यात पाहायला मिळणार आहे. हळूहळू यातील एकेक गोष्टी प्रेक्षकांसमोर येतील. ”

- Advertisement -

हे ही वाचा –   दुबईतील प्रसिद्ध बुर्ज खलिफावर दाखवण्यात आली ‘भेडिया’ चित्रपटाची झलक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -