‘आदिपुरुष’चा वाद पुन्हा चिघळला; दिग्दर्शकाविरोधात गुन्हा दाखल

‘आदिपुरुष’चा वाद पुन्हा चिघळला; दिग्दर्शकाविरोधात गुन्हा दाखल

टॉलिवूड सुपरस्टार प्रभास सध्या त्याच्या आगामी ‘आदिपुरुष’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाबाबत नवनवीन अपडेट सतत समोर येत असतात. गुरुवारी रामनवमीच्या शूभ मुहूर्तावर ‘आदिपुरुष’चे नवीन पोस्टर शेअर करण्यात आले होते. काहींना ते पोस्टर प्रचंड आवडले तर काहींना त्यात अनेक चूका दिसू लागल्या. अशातच, आता पुन्हा एकदा या नव्या पोस्टरवरुन वाद सुरु झाला आहे. शिवाय या पोस्टरमुळे चित्रपटाच्या दिग्दर्शकावर तक्रार दाखल करण्यात आली आहे.

धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

संजय तिवारींच्या मते, ‘आदिपुरुष’च्या नवीन पोस्टरमध्ये ‘रामचरितमानस’ या हिंदू धर्मग्रंथातील पात्रे अयोग्य पद्धतीने दाखवण्यात आली आहेत. या पोस्टरमध्ये भगवान श्रीराम ज्या ड्रेसमध्ये दाखवले आहेत ते रामचरितमानसपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत. यासोबतच श्रीरामांनी जनेयू देखील यात परिधान केलेला दिसत नाही. तसेच या पोस्टरमधील सीतेच्या भांगात कुंकू देखील दिसत नसल्याचं सांगितलं.

दिग्दर्शक ओम राऊत यांनी हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत, असे या तक्रारीत सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 295(A), 298, 500, 34 अंतर्गत तक्रार नोंदवण्यात आली आहे. यासोबतच एफआयआर दाखल करण्याची मागणीही केली आहे.

या दिवशी होणार चित्रपट प्रदर्शित

प्रभास आणि कृति सेनन यांचा ‘आदिपुरुष’ चित्रपट 16 जून 2023 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली-2’ सारख्या चित्रपटानंतर प्रभासला या अवतारात पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे.


हेही वाचा :

बॉलिवूडची वाईट अवस्था पुन्हा सुरू… विवेक अग्निहोत्रींनी पुन्हा डिवचलं

First Published on: April 5, 2023 11:08 AM
Exit mobile version