घरमनोरंजनबॉलिवूडची वाईट अवस्था पुन्हा सुरू... विवेक अग्निहोत्रींनी पुन्हा डिवचलं

बॉलिवूडची वाईट अवस्था पुन्हा सुरू… विवेक अग्निहोत्रींनी पुन्हा डिवचलं

Subscribe

2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या विवेक अग्निहोत्री यांचा ‘द काश्मिर फाइल्स’ चित्रपटाने जगभरात खळबळ उडवली. या चित्रपटामुळे या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री प्रचंड चर्चेत आले. तेव्हापासून अनेक कारणांमुळे विवेक अग्निहोत्री सतत चर्चेत असतात. बॉलिवूडबाबतची खदखद सोशल मीडियावरुन ते अनेकदा व्यक्त करताना दिसतात. असातच, विवेक अग्निहोत्री यांनी बॉलिवूड चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत मोठं व्यक्तव्य केलं आहे.

खरं तर, नुकत्याच काही दिवसांपूर्वी अजय देवगणचा भोला चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र, या चित्रपटाने अपेक्षेपेक्षा फार कमाई केली त्यामुळे नाव न घेता विवेक यांनी बॉलिवूड पुन्हा डिवचलं आहे.

विवेकने ट्वीट करत दिली बॉलिवूड बॉक्स ऑफिस कलेक्शनची माहिती

- Advertisement -

विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्वीट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलंय की, “बॉलिवूडची वाईट अवस्था पुन्हा सुरु झाली आहे. असं वाटतंय की, पूर्ण इंडस्ट्री अशा कलाकारांना मोठी फी देण्यात आनंदी आहेत जे ओपनिंगची हमी देऊ शकत नाहीत. कलाकारांच्या व्यर्थ जीवनशैलीत अनेक पैसे वाया जातात. शेवटी काय बिघडतंय?” असं विवेक यांनी लिहिलं आहे.

‘द काश्मीर फाइल्स’ ठरला होता ब्लॉकबस्टर

2022 मध्ये प्रदर्शित झालेला ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट गेल्या वर्षी सर्वाधिक कमाई करणारा ठरला होता. विवेक यांचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द कश्मीर फाइल्सने बॉक्स ऑफिसवर 252.90 कोटींचा गल्ला जमवला होता. त्याचवेळी विवेक अग्निहोत्री त्याच्या ‘द व्हॅक्सिन वॉर’ या नवीन चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. हा चित्रपट यावर्षी 15 ऑगस्टला रिलीज होणार होता, मात्र आता त्याची रिलीज डेट बदलण्यात येणार असल्याची माहिती आहे.


हेही वाचा :

अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जीला निर्मात्याकडून अश्लील वेबसाइटवर फोटो व्हायरल करण्याची धमकी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -